Latest Marathi News

BREAKING NEWS

‘लढवय्या सहकारी गमावला..!’ लक्ष्मण जगताप यांच्या पार्थिवाचे घेतले चंद्रकांतदादांनी दर्शन

0

पुणे |

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने एक निष्ठावान लढवय्या सहकारी आणि लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे”, अशा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आपला शोक व्यक्त केला आहे.

ते पुढे म्हणाले, “मितभाषी, पण जनतेच्या प्रश्नांसाठी आक्रमक भूमिका घेणारे लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख होती. ‘चिंचवडचा ढाण्या वाघ’ असे त्यांचे वर्णन केले जायचे. गंभीर आजारातही विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकात मतदानाचे आपले लोकशाहीतले कर्तव्य पार पाडून त्यांनी एक उदाहरण घालून दिले. ईश्वर त्यांना सद्गती देवो. लक्ष्मणभाऊ च्या रूपाने आपण एक समर्पित नेता गमावला आहे, चंद्रकांत दादा पाटील यांनी लक्ष्मणभाऊच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं व श्रद्धांजली ही अर्पण केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.