Latest Marathi News

BREAKING NEWS

लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या जाण्याने पक्षाचं मोठं नुकसान झालं आहे – चंद्रकांत पाटील

0

पुणे |

भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 59 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरु होते.जगताप यांची गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लक्ष्मण जगताप यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मुक्ताताईंपाठोपाठ अवघ्या १२ दिवसांत लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या जाण्याने पक्षाचं मोठं नुकसान झालं आहे. लक्ष्मण भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली!

चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, या १५ दिवसातली हि दुसरी दुर्दैवी घटना आहे. अजूनही मुक्ताताईंचे जे दिवस अजूनही झाले नाहीत, श्रद्धांजली सभाही व्हायची आहे, तो पर्यंत हा दुसरा आघात भारतीय जनता पार्टीला झाला आहे. आम्ही सगळे जण एक कुटुंब म्हणून जगतो. त्यामुळे आपल्या कुटुंबातील एक माणूस गेल्याची भावना आहे. लक्ष्मणभाऊ एक खऱ्या अर्थाने जननेता होते. काही जणांचं दरबारी राजकारण असत, काही जणांचं प्रत्यक्ष लोकांमधलं राजकारण असत. लोकांमधलं राजकारण करणारा, लोकांचे प्रश्न जाणणारा, त्यांच्यासाठी भांडणारा, रस्त्यावर उतरणारा, प्रसंगी स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करणारा असा एक चांगला कार्यकर्ता गेला, असे पाटील यांनी म्हटले.

चंद्रकांत पाटील यांनी एक आठवण सांगितली कि, विधानपरिषदेच्या निवडणुकीला सकाळी ९ वाजता निघायचं ठरलं होत, आणि त्यांना ताप आला. डॉक्तरांनी असं सुचवलं कि ताप अंगातून जाई पर्यंत त्यांना परवानगी देणार नाही. त्यामुळे त्यांना न येण्याचा सल्ला दिला पाहिजे असे आम्ही म्हटले. पण ११ वाजता फोन आला कि, आम्ही निवडणुकीसाठी निघणार आहोत. ते आलेच. मुक्ताताई आणि लक्ष्मणभाऊ यांची दोन मत हि अतिशय महत्वाची होती. त्यांची मत मिळाली नसती तर भाजपचा विजय झाला नसता. हि जिद्द त्यांच्यात आहे कि सकाळी ताप आहे आणि ताप उतरताच त्यांनी गाड्या काढायला सांगितल्या आणि निवडणुकीसाठी ते आले. अशी आठवण चंद्रकांत पाटील यांनी सांगितली.

गेली दोन -अडीच वर्ष त्यांच्या या जिद्दी स्वभावामुळे एक दुर्धर आजारावर त्यांनी मातही केली. अचानक महिनाभरापूर्वी पुन्हा गणित बिघडलं आणि आज ते अचानक आपल्यातून गेले. आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या दुखत सहभागी अहोत, आणि लक्ष्मण भाऊंना सद्गती मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो

Leave A Reply

Your email address will not be published.