Latest Marathi News

BREAKING NEWS

“रिक्षाचालक लोहार दाम्पत्याने केले अन्नपूर्णा महाप्रसादाचे पूजन!”

0

बार्शी |

बार्शी शहरामध्ये मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने अन्नपूर्णा योजना राबवली जाते, आज १ डिसेंबर रोजी अन्नपूर्णा योजनेचे महाप्रसादाचे पूजन सागर लोहार व सौ. श्वेता लोहार यांच्या हस्ते करण्यात आले. सागर लोहार यांचा सामाजिक कार्यातही सहभाग असतो, शहरातील व्हीके मार्ट जवळील रिक्षास्टॉप मंडळाचे ते अध्यक्षही आहेत.

मातृभूमी प्रतिष्ठान संचलित अन्नपूर्णा योजना गेली सात वर्षांपासून दातृत्व जतन करणाऱ्या विविध क्षेत्रातील दानशूरांच्या मदतीने अविरत सुरु आहे. दररोज सुमारे दोनशे निराधार लोकांना दोन वेळेचं अन्न निःशुल्क घरपोच केलं जातंय. शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये देखील नाममात्र दरात भोजन वितरित होतय. आज अन्नपूर्णा महाप्रसाद पूजन व वितरण सागर लोहार व श्वेता लोहार या दाम्पत्यांने केले.

Leave A Reply

Your email address will not be published.