मुंबई |
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात वॉरंट बजावण्यात आलं आहे. मुंबई सत्र न्यायालयाने त्यांना हे वॉरंट बजावले आहे. सुनावणीसाठी हजर न राहिल्याने वॉरंट बजावण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला आहे. हनुमानचालिसा प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या खटल्याच्या सुनावणीसाठी हे दाम्पत्य हजर राहिलं नव्हतं, ज्यामुळे त्यांच्याविरोधात हे वॉरंट जारी करण्यात आले आहे.
त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली होती. काही दिवस तुरूंगात काढल्यानंतर कोर्टाने दोघांचाही जामीन मंजूर केला होता. मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला जामीन मंजूर करताना पाच अटी घातल्या होत्या.
न्यायालयाने घातलेल्या अटींनुसार, रवी राणा आणि नवनीत राणा यांना प्रसारमाध्यमांशी बोलण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच पोलीस तपासात कोणतेही अडथळे आणू नये, असे आदेश न्यायालयाने त्यांना दिले होते. त्याचबरोबर सुनावणीवेळी न्यायालयात हजर राहण्याची अटही त्यांना घालण्यात आली. दरम्यान, राणा दाम्पत्याला 11 नोव्हेंबरपर्यंत हजर राहण्याचे निर्देश दिलेले असतानाही ते सतत गैरहजर राहिल्यानं अखेर कोर्टानं जारी केलं आहे. सदरील वॉरंट हे जामीनपात्र असून 5 हजार रुपयांच्या जामीनावावर वॉरंट रद्द करता येणार आहे.