Latest Marathi News

BREAKING NEWS

युट्यूबकडूनच लाखोंची कमाई ; नितीन गडकरी यांनी स्वतः दिली माहिती

0

नागपूर |

युट्यूबर्सच्या कमाईचे आकडे पाहून आपण हरकून जातो. पण केद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी हे युट्यूबकडून पण लाखो रुपये महिना कमवितात. द्रष्टे नेते म्हणून आणि प्रयोगशील मंत्री म्हणून ते लोकप्रिय आहेत. त्यांच्या या विचारांनी अनेक जण प्रभावित झाले आहेत. युट्यूबवर त्यांचे लाखो फॉलर्स तर आहेतच पण सब्सस्क्राईबर पण आहेत.

इंडियन इकॉनॉमिक कॉन्क्लेव २०२३ या कार्यक्रमात गडकरी नुकतेच सहभागी झाले. त्यांनी यावेळी देशातील विविध विकास योजनांची माहिती दिली. युट्यूबपासून ते किती कमाई करतात, याचा खुलासा त्यांनी केला. २०१६ साली त्यांनी युट्यूबवर चॅनल सुरु केले. चॅनलवर त्यांचे सर्व भाषण, पत्रकार परिषद आणि मीडियात चर्चेत आलेले वक्तव्याचे व्हिडिओ पोस्ट होतात. त्यांच्या व्हिडिओवर प्रेक्षकांच्या उड्या पडतात. आतापर्यंत ५.२७ लाख जणांनी त्यांचे चॅनल सब्सक्राईब केले आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी युट्यूबकडून कमाईची माहिती दिली. दरमहा ते युट्यूब चॅनलकडून ४ लाख रुपये कमाई करत असल्याची माहिती त्यांनी उघड केली. कोरोना महामारीच्या काळात त्यांनी युट्यूबवर दिलेल्या लेक्चरवर असंख्य चाहते, फॅन्स, प्रेक्षकांच्या उड्या पडल्या. त्यांच्या युट्यूब सब्सक्राईबरची संख्या खूप वाढली. त्यांनी कोरोनामुळे घरात बंदिस्त झालो असून काही गंमतीशीर किस्से सांगितले. केंद्रीय मंत्री गडकरी कोरोना काळात सर्वांप्रमाणेच घरात कैद झाले. परंतु, अधिकारी, कर्मचारी आणि जनेतशी ते आधुनिक आयुधांनी जोडलेले होते. यावेळी त्यांनी घरात स्वयंपाक केला. व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे लेक्चर घेतले. त्यांनी या काळात ९५० ऑनलाईन लेक्‍चर्स घेतले. त्यांनिी परदेशातील विद्यार्थ्यांसाठी लेक्चर घेतले. हे सर्व लेक्चर त्यांनी युट्यूबवर अपलोड केले. ते लोकप्रिय झालेत. आता त्यांना या व्हिडिओच्या माध्यामातून दरमहा ४ लाख रुपयांची रॉयल्‍टी मिळते.

Leave A Reply

Your email address will not be published.