बार्शी |
बार्शी तहसील कार्यालयामध्ये मंडल अधिकारी म्हणून कार्यरत असणारे उमेश डोईफोडे व सौ. रूपाली डोईफोडे या दांपत्याच्या हस्ते २५ नोव्हेंबर रोजी अन्नपूर्णा योजनेच्या महाप्रसादाचे पूजन व वितरण करण्यात आले, उमेश डोईफोडे एक कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळखले जातात. गेल्या १५ वर्षापासून ते शासकीय सेवेत कार्यरत आहे. नागरिकाच्या समस्या सोडवण्यासाठी एक कार्यक्षम अधिकारी म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे.
मातृभूमी प्रतिष्ठान संचलित अन्नपूर्णा योजना गेली सात वर्षांपासून दातृत्व जतन करणाऱ्या विविध क्षेत्रातील दानशूरांच्या मदतीने अविरत सुरु आहे. दररोज सुमारे दोनशे निराधार लोकांना दोन वेळेचं अन्न निःशुल्क घरपोच केलं जातंय. शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये देखील नाममात्र दरात भोजन वितरित होतय, अन्नपूर्णा महाप्रसाद पूजन व वितरण उमेश डोईफोडे व रुपाली या दाम्पत्यांने केले. विविध सामाजिक कामातही त्यांचा सक्रिय सहभाग असतो, मातृभूमी प्रतिष्ठानचे ते सदस्य आहेत. आज उमेश डोईफोडे यांचा वाढदिवस त्यानिमित्त त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.