Latest Marathi News

BREAKING NEWS

जे जे कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल ; चंद्रकांतदादा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध मागण्या मान्य

0

मुंबई |

जे जे कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेत त्यांच्या विविध मागण्या मंत्रालयात झालेल्या बैठकीत मान्य करण्यात आल्या आहेत. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील त्यामुळे विद्यार्थ्यांनी देखीलआंदोलन मागे घ्यावं असं आवाहन केले, बैठकीत उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, अधीक्षक अभियंता बन गोसावी, उपअभियंता अशोक गायकवाड, जे जे कला महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रतिनिधी व संबंधित अधिकारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना पायाभूत अशा सुविधाची यादी तयार करावी अशी सूचना ही चंद्रकांत दादा पाटील यांनी केली.

मान्य केलेल्या मागण्या

१) नवीन वसतिगृहासाठी शासनाकडून भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे.

२) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी चर्चगेट येथील मातोश्री वसतिगृहात तर मुलींसाठी अंधेरीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिथीगृहात तात्पुरता राहण्याची सोय केली जाईल.

३) विविध महाविद्यालयांतील १६९ प्राध्यापकांची रिक्त पदे एमपीएससी मार्फतच भरली जाणार आहेत.

दरम्यान, विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या अन्य पायाभूत सुविधांची यादी तयार करावी. त्यात सूचनांचा देखील समावेश करून या संदर्भातील प्रस्ताव शासनाकडे सादर करावा. त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.