बीड |
बीडमधील भाजपा आमदार सुरेश धस यांच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील ८ देवस्थानाच्या जमीनी लाटल्याचा आरोप सुरेश धस आणि त्यांच्या कुटुंबीयांवर केला आहे.
आमदार सुरेश धस यांच्यासह त्यांच्या पत्नी, भाऊ, मनोज रत्नपारखे आणि अस्लम पठाण यांच्यासह अनेक लोक यामध्ये सामील आहे. अखेर आज सुरेश धस यांच्यासह संबधितांवर लाचलुचपत प्रतिबंधक कायदा 1988 चे 13 (1) (अ) (ब), 13 (2) ipc 465,468, 471,120 ब, 109 नुसार आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
विशेष बाब म्हणजे, औरंगाबाद खंडपीठाने याप्रकरणातील तक्रारदाराचे निवेदनच एफआयआर म्हणून गृहीत धरावे, असे सांगितले होते. त्यानंतर आमदार सुरेश धस यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. मात्र जे औरंगाबाद खंडपीठाने आदेश दिले होते, तेच आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवले होते. त्यानंतर बीडच्या लाचलुचपत पथकाने मंगळवारी रात्री उशीरा आमदार सुरेश धस यांच्यासह संबधितांवर गुन्हे दाखल केले आहेत.
काय आहे प्रकरण?
बीड जिल्ह्यात वक्फ बोर्डच्या जमीन घोटाळ्यानंतर हिंदू देवस्थानच्या जमिनीची बेकायदेशीर हस्तांतरणाची 8 प्रकरणे समोर आली होती. आणि याचीच पोलखोल ग्राउंड वरून बातमी दाखवत केली होती. त्यानंतर याचा तपास एसआयटीकडे सोपवण्यात आला होता. मात्र एसआयटीने अहवाल दिल्यावरही फौजदारी कारवाई न झाल्याने राम खाडे यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली