Latest Marathi News

BREAKING NEWS

“बार्टी संस्थेत आँल इज वेल…!”

0
  • अँड.कुलदीप आंबेकर
    अध्यक्ष स्टुडंट हेल्पींग हँडस

सतत कोणत्या न कोणत्या विषयाबाबत प्रपोगंडा तयार करायचा.त्यातुन हेतु साध्य करायचा.हा पायंडाच बार्टीत सद्या पडतोय.वर्षानूवर्षा हे मुठभर क्लासेसवाले विद्यार्थींच्या खांद्यावर बंदुक ठेउन आपले दुकान चालवत आले आहेत. आताही तेच करतात १ मे २०२३ पासुन आंदोलन करण्याचं आवाहन ते सर्वांना करतात.प्रश्न जर विद्यार्थी हिताचे असते तर यांना सहकार्य करण्याच काहीच अडचण नव्हते.पण हे बेगडे विद्यार्थी प्रेम लगेच कळते.

कारण,प्रशासनास वेठीस धरुन विद्यार्थीचे भांडवल करुन आपले घोडे दामट्यांच काम हे क्लासवाले वारंवार करतात.त्यांच्या मनासारखे काही झालेच नाही की,बातम्या देतात.त्यावरही काही फरक पडला नाही की,न्यायालयाची दरवाजे ठोठावतात.मग वेठीस धरतात,अधिकारी नमती बाजु घेतात.हे असले ब्लँकमेलिंगचे धंदे.

दुर्दंवांची बाब अशा गोष्टीला बार्टीवाले वरुन ते खालपर्यत त्यांना बळी पडतात.हे आजतागायत वास्तव आहे.
ही स्विकारुन पुढे जाउया. नम्र विनंती,क्लास लाँबिंगला काही घाबरायची गरज नाही. यांना एखदा सुतासारखे सरळ कराच.आमका अधिकारी खिश्यात,मंत्री शब्दाबाहेर नाही,तमक्याची मिनीटात बदली करतो.हा रुबाब यांच्याकडे येतो कुठुन?

कोण पाठबळ देतेय यांना.?बार्टी विकत घेउ ?हे करु ते करु ?अशी भाषा करणारे आता डायरेक्ट कोलले पाहिजेत.हीच ती वेळ. बरं बहुतांशी क्लासवाले एस.सी.प्रवर्गातील आहेत.मग अडचण काय ?ईतरांच्या क्लासचा दर्जा चांगला असुनही त्यांना या प्रक्रीयेत येउ देत नाहीत?म्हणुन ही टोळी लगेच सक्रीय होती.

कारण ते समाजाचे नाहीत.हे दिवटे समाजातील तरुणांची मात्र वाट लावतात.आम्हीच यांचे भले करणार ,जणु काय ठेकाच घेतलाय यांनी.

वर्षनूवर्ष यांच्याकडे युपीएससी पासुन ते पोलीस भरती पर्यतचे क्लास चालवायला आहेत. बरं चालवणं का होयणा,प्रत्यक्ष मात्र त्यांच्याकडं गुणवत्ता,तेथे दर्जा,त्यांचा निकाल,शिक्षकांचा स्टाफ,सुखसुविधा यांवर कधी ते बोलत नाहीत.कसे बोलणार न? कारण काहीच नसते तिथे.

या आणी अशा मंडळीमुळेच गूणवत्तेचा दर्जा घसरतोय.बार्टीचे नाव खराब होते.उलट हेच परत नाकांनी वांगी सोलतात.

३० क्लासेसचे प्रशिक्षण बंद होणार हे थोतांडपणा आहे.यात कसलेही तथ्य नाही.प्रत्यक्ष बार्टीने असे कधीही स्पष्ट केले नाही.हे मात्र क्लासवाले ते ही (एससी) चे सातत्यांनी विद्यार्थीच्या आडुन दबाबतंत्र वापरतात.आपली पोळी भाजुन घेतात.

या उलट्या काळजाच्या औलादी समाजातील कोणत्याही गरीब विद्यार्थीला साधी दमडीची मदत करत नाहीत.एखद्या महिन्याचे विद्यावेतन जर नाही आले तर त्याला बार्टीकडे पाठवतात.पण खिशातले थोडीफार रक्कम देत नाहीत.अहो साधा गाडीखर्च पण देत नाही.तेव्हा काहीच वाटत नाही यांना..

सद्या बार्टीत महिनादोन महीने पण झाले नाहीत,नुकतेच सुनील वारे सर महासंचालक म्हणुन नियुक्त झालेत.त्यांना बार्टी समजुन घेउ द्या.त्यांना काम करायला वेळ द्या.नंतर आरोप प्रतीरोप करुया.

बार्टीतील योजनेच्या सर्व प्रक्रीया सुरळीत चालु आहेत. नुकतीच बी.ओ.जी. बैठकही पार पडलीय. सकारात्मक बाबी घडतायत.जेईईनीट,आयबीपीएस केंद्र ओपन झालेत.बाकी पण यानंतर होणारच आहेत.

काही नतद्रष्ट मंडळीनी तर नवीनच पायंडा सुरु केलाय.
काही झाले की,सामाजिक न्यायविभागाचे मुख्य सचिव सुमंत भांगे साहेब यांच्या बदनामी करायची.काहीनी तर सुपारीच घेतलीय.अशरक्ष;अहो,बाकीच्या संस्थेच्या मुख्य सचिवांची नावे तरी विद्यार्थीना माहीत आहेत का? कसासाठी हे करताय?
सामाजिक न्याय विभागाचे 50% निधी वर्षनुवर्ष अखर्चित असतो यावर भूमिका घ्यावी.

भांगे साहेबांना टारगेट करणे
हा शुद्ध खोडसाळपणा आहे. त्यांच्याबाबत काही गोष्टीत विद्यार्थीचे मतभेद असतील ते संवादानी सोडवायला हवेत.
पण व्यक्तीदोष नसला पाहीजे.तो सातत्याने त्यांच्याबाबत दिसुन येतोय. आम्ही त्यांच्या बरोबर आहोत.खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा आहोत.यात तीळमात्र शंका नाही.

मुख्य सचिव भांगे साहेब कर्तव्यदक्ष,संवेदनशील व सक्षम अधिकारी आहेत.अनेक योजना ते किफायदशीर, दुरदृष्टीकोनातुन राबवतात.

बार्टी व समाजकल्याण विभागाला नवा आयाम देण्याचे काम ते करतात.त्यांना कोणाच्या प्रमाणपत्राची अवश्यकता नाही.पण त्यांचे अशावेळी चारीत्रहनन किंवा दोषी ठरवणं.
हे योग्य नाही.हे समाजानी लक्षात घ्यावे.

समाजातील जागृत व सजग विद्यार्थीनी सांगु इच्छीतो,याला आपण बळी पडले न पाहीजे. अशा आंदोलनामुळे समाजाची दिशाभुल होत आहे.

विद्यार्थी मध्ये संभ्रम अवस्था निर्माण करुन,त्यांना भावनिक करुन आपली खुंटी बळकट करण्याचे काम संस्थाचालक करत आहेत.वेळेवरच ते हाणुन काढुया.

बार्टीला बदनाम करण्याचं थांबूया.बार्टीला साथ देउया..

Leave A Reply

Your email address will not be published.