Latest Marathi News

BREAKING NEWS

दोन वर्षांत मुंबई खड्डे मुक्त करणार; मुख्यमंत्र्यांचा मुंबईकरांना शब्द

0

मुंबई | महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ध्वजारोहण केल्यानंतर मुंबईत बांधण्यात येणाऱ्या कोस्टल रोडची पाहणी केलीतसेच एकनाथ शिंदे यांनी नरिमन पॉईंटजवळ कोस्टल रोडची पाहणी केली. कोस्टल रोडच्या कामाचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी कोस्टल रोड सुरु होण्याची तारीख सांगितली आहे. तसेच येत्या दोन वर्षांत मुंबई खड्डे मुक्त करण्याचा शब्द दिला आहे. कोस्टल रोड या वर्षाच्या अखेरीस सुरू होणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मुंबईमध्ये खड्डे मुक्त रस्ते करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. दोन वर्षात पूर्ण मुंबई खड्डे मुक्त होणार. मुंबईत सुशोभीकरण करण्यासाठी हजाराच्या वर जागा शोधून काढल्या आहेत. या जागांवर सुशोभीकरण करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या रस्त्याच्या आजूबाजूच्या घरांनाही रंगरंगोटी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सुशोभीकरणाच्या माध्यमातून कोळीवाड्याचाही विकास करणार आहोत, असा शब्द एकनाथ शिंदे यांनी मुंबईकरांना दिला आहे.

मरीन ड्राईव्ह आणि इतर चौपाटी परिसरात लाखो मुंबईकर कुटुंबासोबत आनंद घेण्यासाठी येतात. त्यामुळे ही चौपाटी स्वच्छ असली पाहिजे. तसेच स्वच्छतागृहांची आवश्यकता आहे. त्यामुळे सार्वजनिक स्वच्छतागृह तीन ते चार ठिकाणी उभ्या करण्याच्या सूचना मी दिल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.

पूर्ण समुद्राचा पट्टा स्वच्छ असला पाहिजे, यासाठी आम्ही पाहणी दोरा आम्ही आयोजित केला आहे. पालिकेच्या आयुक्तांना सूचना दिल्या आहेत की, जागतिक लेव्हलचे फोल्टन लेझर शो आणि इतर गोष्टी डेव्हलप केल्या पाहिजेत. जेने करून मुंबईकरांच्या मनातील आनंदात भर पडेल.या सगळ्यातून पर्यटन, रोजगार, स्वच्छता आणि सुशोभीकरण अशा प्रकारचं मल्टिपल काम करण्याचा आमचा मानस आहे. राहुल नार्वेकर आणि पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही मुंबईतील सुशोभीकरणाच्या कामात लक्ष घातले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.