बार्शी |
बार्शी शहरातील शिवशक्ती बँकेमध्ये लिपिक म्हणून कार्यरत असणारे नागेश दिलीप पानसरे व त्यांच्या आई दिपाली दिलीप पानसरे यांच्या हस्ते २९ जानेवारी रोजी अन्नपूर्णा योजनेचे पूजन करण्यात आले. नागेश पानसरे हे सामाजिक कार्यात नेहमीच आग्रणी असतात. ते गेल्या अनेक वर्षापासून बँकिंग मध्ये कार्यरत आहेत.
मातृभूमी प्रतिष्ठान संचलित अन्नपूर्णा योजना गेली ७ वर्षांपासून दातृत्व जतन करणाऱ्या विविध क्षेत्रातील दानशूरांच्या मदतीने अविरत सुरु आहे. दररोज सुमारे दोनशे निराधार लोकांना दोन वेळेचं अन्न निःशुल्क घरपोच केलं जातंय. शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये देखील नाममात्र दरात भोजन वितरित होतय. मातृभूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमही राबवण्यात येतात, शहरातील युवा वर्गाला मार्गदर्शन करण्यासाठी वेळोवेळी व्याख्याने आयोजित केली जातात. नागेश पानसरे व त्यांच्या आई दिपाली पानसरे यांच्या हस्ते आज अन्नपूर्णा योजनेचे पूजन व वितरण करण्यात आले.