Latest Marathi News

BREAKING NEWS

“गॅलेक्सी हॉस्पिटलचा सातवा वर्धापन दिन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत संपन्न…!”

0

नांदेड |

गॅलक्सी हॉस्पिटल नांदेडच्या सातव्या वर्धापन दिन रुग्ण सुविधा आणि रुग्ण शिक्षणासाठी वाढ. अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते एंडोस्कोपी मशीन आणि आपलं पोट आपल्या हातात या लोकप्रिय पुस्तकाच्या पाचव्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. मागील सात वर्षांपासून पचनसंस्था विकारांच्या रुग्णांसाठी अहोरात्र काम करणारी आणि अद्ययावत तंत्रज्ञानचा अवलंब करून रुग्णोपचार करणाऱ्या गॅलक्सी पचनसंस्था आणि यकृतविकार रुग्णालयाचा सातवा वर्धापन दिन प्रजासत्ताक दिनी थाटात संपन्न झाला.

याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण, तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्कृती संवर्धन मंडळाचे अध्यक्ष प्रमोद देशमुख, शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री डी पी सावंत, महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सदस्य श्री अमर भाऊ राजूरकर आणि नांदेडच्या विश्व हॉस्पिटलचे जेष्ठ मूत्ररोग तज्ज्ञ डॉ. उमेश भालेराव डॉ. सुशील राठी आणि गॅलक्सी हेल्थकेअर फाउंडेशनचे विश्वस्त श्री जयतीर्थ जोशी, सौ. मंगला जोशी आणि पुण्याहून कौस्तुभ कुलकर्णी उपस्थित होते. याप्रसंगी मुख्य अतिथी आणि पाहुण्यांनी बोरबन, वजिराबाद येथील गॅलक्सी रुग्णालयाच्या सातव्या वर्धापन दिनाचे दीप प्रज्वलन करून रुग्णालयाच्या अद्ययावत सुविधांची पाहणी केली. पचनसंस्थेच्या रुग्णांची तोंडाद्वारे नेहमी एंडोस्कोपी करण्यात येते परंतु, ज्यांचे तोंड उघडत नाही अशा रुग्णांसाठी गॅलक्सीने नाकाद्वारे पचनसंस्थेच्या मार्गात जाणारी एंडोस्कोपी मशीनचे अशोकराव चव्हाण साहेबांच्या हस्ते लोकार्पण केले. यानंतर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील पहिल्या फिरत्या एंडोस्कोपी रुग्णालयाच्या बांधणी आणि कामाची चित्रफित पाहून प्रत्यक्ष व्हॅनची पाहणी केली.

याप्रसंगी व्यासपीठाच्या बॅकड्रॉपमध्ये कोणतीही बॅनर न ठेवता फिरत्या एंडोस्कोपी रुग्णालयाची गाडीच ठेवण्यात आली होती, हे याचे मुख्य आकर्षण होते. यावेळी प्रज्ञा प्रकाशनातर्फे सिद्ध केलेल्या आणि पचनसंस्था विकार तज्ज्ञ डॉ. नितीन जोशी लिखित ‘आपलं पोट आपल्या हातात’ या लोकप्रिय पुस्तकाच्या पाचव्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा सत्कार आणि स्वागत झाल्यानंतर गॅलक्सी रुग्णालयाच्या जेष्ठ कर्मचाऱ्यांचा सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. फिरत्या एंडोस्कोपी रुग्णालयाने मागील वर्षभरात नांदेड जिल्ह्यात एकूण ११००० किलोमीटरचा प्रवास करून १४ तालुक्यांमध्ये २८४ रुग्णांची, ३७ शिबीरांमध्ये पचनसंस्थेच्या कॅन्सरचे पहिल्या टप्प्यात निदान करण्यासाठी माफक दरात एंडोस्कोपी तपासणी केली आहे. या सर्व शिबिरांचे आयोजन करणाऱ्या डॉक्टरांचे आणि देणगीदारांचे प्रतिनिधिक स्वरूपात कृतज्ञता पत्र, शाल आणि पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण म्हणाले की गॅलक्सी रुग्णालय हे नांदेड परीक्षेत्रातील पचनसंस्थाविकार रुग्णांसाठी मोठी उपलब्धी आहे. फिरत्या एंडोस्कोपी रुग्णालयाची किनवट आणि माहूरसारख्या गावांमध्ये जाऊन सेवा देण्याची धडपड ही वाखाणण्याजोगी तर आहेच पण पुण्या-मुंबईच्या सुविधांच्या तुलनेतच आहे. याप्रसंगी अशोकरावांनी नांदेडच्या सर्वच वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांच्या योगदानाचे भरभरून कौतुक केले. येत्या काळामध्ये नांदेडच्या वैद्यकीय क्षेत्रात भर पाडण्यासाठी डॉक्टरांसोबत चर्चा करण्याची ही त्यांनी मनोगत व्यक्त केले. गॅलक्सी रुग्णालयात असलेल्या सुविधा आणि स्वच्छता यावर त्यांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. गॅलक्सी रुग्णालयाचे संचालक डॉ. नितीन जोशी यांनी आजवर या रुग्णालयात मागच्या सात वर्षात ६५ हजारांहून अधिक पचनसंस्था विकारांची तपासणी व उपचार आणि १८ हजारांहून अधिक रुग्णांवर एंडोस्कोपी तपास व उपचार करण्यात आल्याची माहिती दिली. मराठवाड्यातील वैद्यकीय क्षेत्रात गॅलक्सी हे औरंगाबाद नंतर एंडोस्कोपी व पोटविकारांचे सर्वात मोठे रुग्णालय असल्याचे डॉ. नितीन जोशी यांनी उपस्थित त्यांना दाखवून दिले. याप्रसंगी उपस्थित नांदेड येथील सर्वच ज्येष्ठ आणि श्रेष्ठ डॉक्टरांनी गॅलक्सीच्या पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.