Latest Marathi News

BREAKING NEWS

“डॉ. शरद इतापे दांपत्याने केले अन्नपूर्णा महाप्रसादाचे पूजन..!”

0

बार्शी |

बार्शी शहरातील सुप्रसिद्ध अशा सुश्रुत हॉस्पिटलमध्ये डॉ. शरद शंकर इतापे हे कार्यरत आहेत, याशिवाय शेंद्री व कोरफळे येथे वैद्यकीय सेवा देतात, त्यांच्या पत्नी डॉ. मेघा इतापे ह्या जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून काम करतात. या डॉक्टर दांपत्याच्या हस्ते अन्नपूर्णा योजनेच्या महाप्रसादाचे भोजन व वितरण २४ नोव्हेंबर रोजी त्यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

मातृभूमी प्रतिष्ठान संचलित अन्नपूर्णा योजना गेली सात वर्षांपासून दातृत्व जतन करणाऱ्या विविध क्षेत्रातील दानशूरांच्या मदतीने अविरत सुरु आहे. दररोज सुमारे दोनशे निराधार लोकांना दोन वेळेचं अन्न निःशुल्क घरपोच केलं जातंय. शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये देखील नाममात्र दरात भोजन वितरित होतय. आज दिनांक २० नोव्हेंबर अन्नपूर्णा महाप्रसाद पूजन व वितरण खंडागळे कुटुंबीयांच्या हस्ते करण्यात आले. कोविड १९ च्या काळातही डॉक्टर इतापे दांपत्याने रुग्णाची सेवा केली, याशिवाय हे दांपत्य सामाजिक कार्यातही अग्रेसर आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.