Latest Marathi News

BREAKING NEWS

चित्रपट अभ्यासक सुधीर नांदगावकर यांचे निधन

0

मुंबई |

सुधीर नांदगावकर यांनी आयुष्यातील एक अविभाज्य आणि महत्वपूर्ण काळ हा चित्रपट संस्कृतीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी व्यतित केला. चित्रपट संस्कृतीचा प्रचार व प्रसार व्हावा आणि जगभरातील चांगल्या दर्जाचे चित्रपट इथल्या मराठी रसिकांना पाहता यावेत व त्यावर एकत्रित चर्चा व्हावी यासाठी त्यांनी प्रभात चित्र मंडळ या त्यांच्या फिल्म सोसायटी चळवळीमार्फत केलेली धडपड आणि मेहनत वाखाणण्याजोगी आहे.

परदेशी चित्रपट म्हणजे हॉलिवूड चे चित्रपट या समजातून बाहेर काढून जगभरातील चित्रपटांच्या विविध जागतीक प्रवाहांशी मराठी रसिकांना जोडण्याचे काम केले. व प्रभात चित्र मंडळ या मुंबईतील फिल्म सोसायटी मार्फत येथील सुजाण मराठी रसिकांना तसेच साहित्य, संगीत व नाटक या क्षेत्रातील जाणकारांना या चळवळीशी जोडले.

मुंबईतील सर्वात जुनी फिल्म सोसायटी ‘प्रभात चित्र मंडळ’ , ‘फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी ऑफ इंडिया’ आणि चित्रपट समिक्षकांची आंतरराष्ट्रीय संघटना ‘फिप्रेस्की’ यांमधे त्यांचा महत्वपूर्ण सहभाग होता. रात्रंदिवस झटणारा कार्यकर्ता आणि उत्तम संघटक अशी सुधीर नांदगावकर यांची ख्याती झाली. सुधीर नांदगावकर यांच्या फिल्म सोसायटी चळवळीचे महत्वाचे पैलू म्हणजे दर्जेदार चित्रपट विषयक मजकूर देणारे ‘वास्तव रूपवाणी’ हे नियतकालिक. तसेच ‘मामी’ आणि ‘थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव’ हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण आणि नावाजलेले दोन चित्रपट महोत्सव. भारतीय व जगभरातील विविध क्षेत्रातील आणि प्रवाहातील चित्रपटांचे चित्रीकरण या महोत्सवांमधे करण्यात आले. रसिकांना आणि मराठी चित्रपट सृष्टीतील जाणकारांना ते पाहता व अभ्यासता आले.

सत्यजित राय हे चित्रपटातील दैवत. तर अटल बिहारी वाजपेयी राजकारणातील. आज डिजिटली जग खूप पुढे गेलेल आहे आणि चित्रपट पाहण्याची विविध असंख्य माध्यम उपलब्ध आहेत. तरिही ‘थर्ड आय आशियायी चित्रपट महोत्सव’ आयोजित करणे व बदलत्या काळात ‘प्रभात चित्र मंडळ’ औचित्यपूर्ण ठेवणे हे त्यांचे ध्यासपर्व आजतागायत सुरु होते.

Leave A Reply

Your email address will not be published.