पुणे |
राष्ट्रीय जलतरणपटू गीता मालुसरे यांच्या हाताला जेलीफिशने दंश केलेला होता, गीताची जिद्द व डॉक्टरच्या प्रयत्नामुळे ती संकटातून बाहेर पडली. आज एक जानेवारी रोजी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी तिच्या घरी जाऊन तब्येतीची विचारपूस केली.
यावेळी चंद्रकांत दादांनी गीताच्या पुढील उपचारासाठी व करिअरसाठी मदतीची ग्वाही दिली व गीतावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा सत्कारही केला. देशांतर्गत अनेक स्पर्धांमध्ये अनेक मेडल गीता मालुसरे यांनी मिळवले आहेत. नोव्हेंबर मध्ये विजयदुर्ग परिसरात झालेल्या स्पर्धेत तिने सहभाग घेतला होता आणि त्यामध्ये तिचा घात झाला समुद्रामध्ये पोहोचताना खतरनाक विषारी अशा जेली फिशने तिच्या हाताला चावा घेतला. वयाच्या पाचव्या वर्षापासून गीता ही स्विमिंग करते म्हणून तुला म्हणून तिला जलराणी या नावानेही ओळखले जाते. जेलीफिजशच्या दौशामुळे तिचा हातही निकामी झाला होता.