Latest Marathi News

BREAKING NEWS

कौतुकास्पद…! सेवेत रुजू सैनिकांच्याप्रती मातृभूमीचं दायित्व

0

बार्शी |

झालं असं सौ.अनिता मुकुंद ठोंगे ह्या सुश्रुत हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या पेशींची कमतरता डेंग्यू सदृश्य तापेची लक्षणे रक्तदाब कमी ह्या आजाराची लक्षणे दिसून आल्याने डॉ. संजय अंधारे साहेबांनी आयसीयूमध्ये ऍडमिट करून घेतले आजार बरा झाल्यानंतर पाच दिवसांनी डिस्चार्ज देण्यात आला.

सौ.अनिता यांनी आपण मेजर मुकुंद ठोंगे यांच्या धर्मपत्नी असल्याचे सांगितले आणि तुम्ही दिवाळीत भाऊबीज साठी गावी घरी आला होता. एव्हाना लक्षात येताच डॉ. अंधारे साहेबांनी लागलीच मातृभूमी प्रतिष्ठानच्या पदाधिकारी वर्गास बोलावून घेत मेजर मुकुंद ठोंगे यांना मातृभूमी प्रतिष्ठानचा अनेक वर्षापासून सुरु असलेला दिवाळी सैनिकांच्या दारी उपक्रम संदर्भात माहिती दिली. नंतर त्यांना पुष्य देऊन सन्मानित केले सहाजिकच हॉस्पिटलचे संपूर्ण बिल माफ करण्यात आले.

मातृभूमी प्रतिष्ठान दर वर्षी एक गाव निवडून त्या गावातील सेवेत रुजू असलेले सैनिकांच्या घरी दिवाळी भाऊबीज साजरी करते. प्रतिष्ठानचे डॉ.संजय अंधारे व डॉ. लक्ष्मीकांत काबरा या उपक्रमात सहभागी असतात. मेजर मुकुंद ठोंगे हे सीआरपीएफ मध्ये दिल्लीत भारताचे गृहमंत्री अमित शहा यांच्या संरक्षण विभागात संरक्षक म्हणून सेवा बजावत आहेत. घरी जाताना ठोंगे कुटूंबीय भावनिक झाले होते डॉक्टर साहेबांचे आभार व्यक्त करुन आनंदाश्रू नयनाने निरोप घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.