बार्शी |
बार्शी शहरातील आदेशा टायर एजन्सी चे मालक आशिष राऊत व त्यांच्या पत्नी स्वप्नाली राऊत या दांपत्याच्या हस्ते १७ जानेवारी रोजी अन्नपूर्णा योजनेचे पूजन करण्यात आले. गेल्या सात वर्षापासून बार्शी शहरातील तेलगिरणी चौक येथे ‘आदेशा टायर एजन्सी’ नावाने टायर विक्रेते आहेत. राऊत कुटुंबीयांचा सामाजिक कार्यत सहभाग असतो.
मातृभूमी प्रतिष्ठान संचलित अन्नपूर्णा योजना ही गेल्या अनेक वर्षापासून बार्शी शहरांमध्ये कार्यरत आहे, विविध क्षेत्रातील दानसूराच्या मदतीने हे कार्य अविरतपणे चालू आहे. गेल्या सात वर्षापासून दररोज २०० गरजूना निशुल्क दोन वेळेचे जेवण घरपोच केले जाते. शहरातील विविध हॉस्पिटलमध्येही देखील नाममात्र दरात भोजन वितरित केले जाते. यासह मातृभूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध उपक्रमाचे आयोजन ही केले जाते. अन्नपूर्णा महाप्रसाद पूजन व वितरण आशिष राऊत व स्वप्नाली या दाम्पत्यांने केले.