Latest Marathi News

BREAKING NEWS

आपलं औषध काम करू लागलंय, चीनला सोनू वांगचुक यांच सडेतोड उत्तर

0

कोरोनाची जन्मभूमी म्हणून जगभरात चीनवर निशाणा साधण्यात येत आहे. दुसरीकडे चीन भारतीय सीमेवर आपल्या कुरापती कमी करताना दिसत नाही. दुसरीकडे भारतामध्ये चिनी वस्तुविरोधात सोशल मीडियावर जोरदार मोहीम राबवली जात आहे. चिनी माध्यमांमध्ये आता भारताला आपल्या वस्तूंशिवाय पर्याय नसल्याची भाषा केली जात आहे.

सामान्य भारतीयांना चीनविरोधात भडकवण्याची आणि चीनला कलंकित करण्याचा प्रयत्न जाणूबूजून केला जात आहे. चीनची उत्पादनं सामान्य भारतीयांच्या जीवनातील अविभाज्य भाग बनले आहेत आणि ते हटवणं कठिण आहे. चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन पूर्णपणे अपयशी ठरेल, असं ग्लोबल टाईम्सनं एका लेखात म्हटलं होतं. 

चिनी विरोधात ‘बुलेट विरुद्ध व्हॅलेट’ची मोहीम राबवण्याची गरज असल्याचा सोनम वांगचुक यांचा हिव्हिडिओ मागील आठवड्यात जोरदार व्हायरल झाला होता. आता चिनी मीडियातून भारताला चुचकारले जात असताना वांगचुक यांनी पलटवार केला आहे.

अमूलनं चीनविरोधात एक जाहिरात टाकली होती त्यानंतर त्यांचा अकाऊंट बंद करण्यात आला होता. तसंच काही अॅपही गुगलनं हटवली होती आणि ग्लोबल टाईम्समधईल लेखाविरोधात माझी प्रतिक्रिया काय असा प्रश्न मला विचारण्यात आला. जर ट्विटर आणि गुगलनं असं केलंय तर ती आपल्यासाठी चांगली बाब आहे. आपलं जे औषध आहे ते काम करू लागलंय, असं वांगचुक यांनी म्हणाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.