Latest Marathi News

BREAKING NEWS

पुन्हा सुरू होणार क्रिकेटचा थरार, हे दोन देश येणार आमनेसामने

0

जगभरामध्ये कोरोनाने थैमान घातल्याने सर्वच क्षेत्रावर त्याचा परिणाम झाला आहे. क्रीडा क्षेत्राला फेदेखील याचा फटका बसत आहे. करोना विषाणूचा सामना करण्यासाठी मार्च महिन्यापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे. BCCI नेदेखील IPL 2020 ही स्पर्धा पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केली आहे. मात्र क्रीडा स्पर्धा रद्द होत असल्यामुळे होणार आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी ICC ने विविध प्रयत्न सुरु केले आहेत. या प्रयत्नांना आता हळूहळू यश येताना दिसत आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने जुलै महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिकेचं वेळापत्रक जाहीर केलं 

 जून महिन्यात वेस्ट इंडिजचा नियोजित इंग्लंड दौरा होता, मात्र कोरोनामुळे तो रद्द करण्यात आला होता. आता ८ जुलैपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. ICC च्या नव्या नियमांचा अवलंब करण्याच्या दृष्टीने मालिका सुरू होण्याच्या महिनाभर आधीच वेस्ट इंडिजचा संघ इंग्लंडमध्ये दाखल होत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे हे सर्व कसोटी सामने प्रेक्षकांविना खेळवले जाणार आहेत. 

Leave A Reply

Your email address will not be published.