Latest Marathi News

BREAKING NEWS

मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या कामाची पद्धत सारखीच –  संजय राऊत

0

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाची पद्धत सारखीच आहे. त्यामुळे मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाही अशी टीका करण्यापूर्वी विरोधकांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेत्यांना लगावला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरात बसून राहणारे पहिलेच मुख्यमंत्री आहेत अशी टीका भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी काल केली होती.

विरोधकांनी केलेल्या टीकेला संजय राऊतांनी खास आपल्या शैलीत उत्तर दिले आहे. संपूर्ण आघाडी सरकारचे मंत्रिमंडळ राज्यात फिरत आहे. करोना संसर्गाच्या परिस्थितीचा आढावा घेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाची पद्धत सारखीच आहे, हे विरोधकांनी प्रथम लक्षात घ्यावे. पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री त्यांच्या कार्यालयात बसून काम करतात. ही काळाची गरज आहे. त्यामुळेच मुख्यमंत्रीही कार्यालयात बसून सर्व यंत्रणांवर लक्ष ठेवून आहेत असा टोला संजय राऊतांनी विरोधकांना लगावला.

आज सोशल डिस्टन्सिंग हेच कोरोना रोखण्यसाठी काळाची गरज आहे. मुख्यमंत्री जिथं जातात तिथं हमखास गर्दी होते त्यामुळे कोरोना वाढू शकतो. आज राष्ट्रपती आणि पंतप्रधान ह्याच नियमांचे पालन करत आहे. मग मुख्यमंत्री का बरं नियम मोडतील. हा सवाल करत मुख्यमंत्री कोठे बसून काम करतील हा त्यांचा अधिकार आहे असे सुद्धा संजय राऊत यांनी बोलून दाखविले.

Leave A Reply

Your email address will not be published.