Latest Marathi News

BREAKING NEWS

तुम्ही आणलेलं दूध भेसळयुक्त तर नाही? ओळण्यासाठी वापर या ट्रिक

0

दररोज आपण आपल्या दिवसाची सुरवात चहाने करतो तर कुणाला कॉफी प्यायची सवय असतं, यामध्ये दूध लागतंच. तर दूध पिऊन दिवसाची सुरुवात करतो. लहानांपासून तर वृद्धापर्यंत हे महत्त्वाचं असतं. मात्र याच दुधामध्ये अनेकदा भेसळ पाहायला मिळते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रासच्या संशोधकांनी दुधाची शुद्धता तपासण्यासाठी एक अनोखं संशोधन केलंय. IIT मद्रासने त्रिमितीय पेपरवर आधारित पोर्टेबल डिव्हाइसचा शोध लावला आहे. जो 30 सेकंदात दुधातील भेसळ शोधू शकतो.

संशोधकांनी सांगितल्यानुसार, ‘घरच्या घरी दूध भेसळयुक्त आहे की नाही हे तपासता येऊ शकतं. हे डिव्हाईस दूधात युरिया, डिटर्जंट, साबण, स्टार्च, हायड्रोजन पेरॉक्साइड, सोडियम-हायड्रोजन-कार्बोनेट, मीठ आणि दुधातील इतर भेसळ शोधू शकते. देशात भेसळयुक्त दुधाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत.अशा परिस्थितीत सर्वसामान्य ग्राहकांना या उपकरणामुळे मोठा दिलासा मिळू शकतो.
कमी पैशात कार इन्शुरन्स हवंय ना? मग माहिती असायलाच हव्यात या 5 ट्रिक्स

दूध हे सर्वांसाठीच आरोग्यदायी मानलं जातं. यामध्ये जीवनसत्त्वे, कॅल्शियम, प्रथिने, फॉस्फरस आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळतात. मात्र, दुधाच्या शुद्धतेबाबत लोकांच्या मनात विविध प्रकारचे प्रश्न आहेत. कारण सध्याच्या काळात दुधातील भेसळ वाढली आहे. दिल्ली, मुंबईसह अनेक मोठ्या शहरांमध्ये दूध मागणीपेक्षा कमी असतं. अशा वेळी लोक यामध्ये भेसळ करतात. दुधातील ही भेसळ सामान्य माणसाला ओळखता येत नसल्याने त्याच्या पौष्टिकतेवर विपरीत परिणाम होण्यासोबतच लोकांच्या आरोग्याशीही खेळ केला जातोय.

IIT मद्रासने 3D पेपरवर आधारित पोर्टेबल डिव्हाइसचा शोध लावलाय. जे केवळ 30 सेकंदात दुधात भेसळ शोधू शकते. ही टेस्ट तुम्ही घरीही करू शकता. येत्या काही दिवसांत सरकारच्या मान्यतेनंतर हे उपकरण सर्व लोकांसाठी उपलब्ध होऊ शकते. हे यंत्र दुधात युरिया, डिटर्जंट, साबण, स्टार्च, हायड्रोजन पेरॉक्साईड यासह दुधात केलेल्या कोणत्याही प्रकारची भेसळ शोधू शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.