नवी दिल्ली : एक वर्षापासून शेतकर्यांच्या प्रश्नावर मौन बाळगणारे नवज्योतसिंग सिद्धू आता मैदानात उतरले आहेत. पंजाबचे माजी मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनीही लोकसभेत मंजूर झालेल्या दोन वादग्रस्त कृषी विधेयकाविरोधात आवाज उठविला आहे. सिद्धू यांनी एकामागून एक ट्विट केले. पहिल्या ट्वीटमध्ये असे लिहिले होते की, सरकारें तमाम उम्र यही भूल करती रही, धूल उनके चेहरे पर थी, आईना साफ करती रही.
सरकारें तमाम उम्र यही भूल करती रही,
धूल उनके चेहरे पर थी, आईना साफ करती रही, 1/2— Navjot Singh Sidhu (@sherryontopp) September 18, 2020
दुसरे ट्विट त्यांनी पंजाबीमध्ये केले आहे. त्यात त्यांनी लिहिले की, शेतकरी हा पंजाबचा आत्मा आहे. शरीराच्या जखमा बर्याय होतात पण आत्म्याच्या नाहीत. आमच्या अस्तित्वावरचा हल्ला खपवून घेतला जाणार नाही. युद्धाचा बिगुल वाजवा क्रांती करा. पंजाब, पंजाबी आणि प्रत्येक पंजाबी शेतकर्यांच्या सोबत आहे.
ਕਿਸਾਨੀ ਪੰਜਾਬ ਦੀ ਰੂਹ,
ਸਰੀਰ ਦੇ ਘਾਓ ਭਰ ਜਾਂਦੇ ਹਨ,
ਪਰ ਆਤਮਾ 'ਤੇ ਵਾਰ,
ਸਾਡੇ ਅਸਤਿਤਵ ਉੱਤੇ ਹਮਲਾ ਬਰਦਾਸ਼ਤ ਨਹੀਂ।
ਜੰਗ ਦੀ ਤੂਤੀ ਬੋਲਦੀ ਹੈ – ਇੰਕਲਾਬ ਜ਼ਿੰਦਾਬਾਦ,
ਪੰਜਾਬ, ਪੰਜਾਬੀਅਤ ਤੇ ਹਰ ਪੰਜਾਬੀ ਕਿਸਾਨਾਂ ਦੇ ਨਾਲ।
2/2 pic.twitter.com/7QPDmFbEC0— Navjot Singh Sidhu (@sherryontopp) September 18, 2020
पंजाबमध्ये कृषी संबंधित बिलांना बराच विरोध होत असल्याने कारण शेतकर्यांकना आणि व्यापर्यांना कृषिउत्पन्न बाजारसमित्या संपुष्टात येण्याची भीती वाटत आहे. यामुळेच राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांनी कृषी बिलाला विरोध दर्शविला आहे. या मालिकेत, केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी शेतीशी संबंधित बिलांच्या निषेधार्थ मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे.