नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये पंचायत सदस्याच्या 9 वर्षांच्या मुलाची अपहरण करून हत्या करण्यात आली. आरोपीने वर्ग 3 मध्ये शिकणार्या निष्पाप विद्यार्थ्याचे हात-पाय बांधून त्याला डीव्हीसी कालव्यात जिवंत फेकले.
पंचायत सदस्य बुद्धदेव दोलुई यांचा 9 वर्षांचा मुलगा संदीप दोलुई याचे बुधवारी रात्री गावातील तीन तरुणांनी अपहरण केले होते. अपहरणानंतर खंडणीसाठी त्यांनी 7 लाख रुपयांची मागणी केली. शेवटी 3 लाख रुपयांच्या बदल्यात ते मुलाला सोडायला तयार झाले. मात्र तरीही पैसे न मिळाल्याने आरोपींची निष्पाप मुलाचे हात पाय बांधून त्याला डीव्हीसी कालव्यात जिवंत फेकून दिले.

या घटनेनंतर संतप्त स्थानिक लोकांनी अपहरण केल्याच्या आरोपावरून सुब्रत मांझी, जयंत बाग आणि मंगलदीप दोलुई या तीन तरुणांच्या घराची तोडफोड करुन आग लावली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण आहे. या घटनेनंतर पोलिसांनी शुक्रवारी सकाळी संदीपचा मृतदेह डीव्हीसी कालव्यातून ताब्यात घेतला.