Latest Marathi News

BREAKING NEWS

नव्या उड्डापुलामुळे पुणेकरांची वाहतूक कोंडीची समस्या नक्की सुटेल – चंद्रकांत पाटील

0

पुणे |

पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून या उड्डाण पुलाचे उदघाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते १२ ऑगस्ट रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर १४ जुलै रोजी पुण्याचे पालकमंत्री

पाटील यांनी या उड्डाण पुलाच्या कामाची पाहणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये सर्वच क्षेत्रात भरीव कामे होत आहे.

हि भाजपाची वचनपूर्ती! असल्याचे म्हणत त्यांनी भारतीय जनता पक्षाने पुणेकरांना दिलेला आणखी एक शब्द पूर्ण होत असल्याचा आनंद होत असल्याचे म्हंटले. पुणेकरांची महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पुण्यातील चांदणी चौकात उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, याचे उद्घाटन केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते येत्या १२ ऑगस्ट रोजी होणार आहे. आज चांदणी चौकात जाऊन या कामाची पाहणी केली. या नव्या उड्डापुलामुळे महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या पुणेकरांची वाहतूक कोंडीची समस्या नक्की सुटेल, असा विश्वास यावेळी पाटील यांनी व्यक्त केला.

यावेळी त्यांच्या समवेत प्रशासकीय अधिकारी, भाजपचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.