Latest Marathi News

BREAKING NEWS

हत्तीज येथे गळफास घेऊन युवकांची आत्महत्या ; वैराग पोलिसात नोंद

0

वैराग :

बार्शी तालुक्यातील हत्तीज येथे एका 35 वर्षीय तरुणाने शेतातील झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटना 3 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता घडली असून मयताचे वडील विलास भिका सावंत यांनी वैराग पोलिसात माहिती दिल्याने गुन्ह्याची नोंद झाली आहे .

हत्तीज येथील विलास सावंत यांना दोन मुले आहेत. ती गेली सुमारे वीस वर्षापासून कुटुंबासह विभक्त राहतात . मयत शहाजी याचा एकमुडी स्वभाव असल्याने तो यापूर्वी वारंवार आत्महत्या करण्याचे विचार बोलून दाखवत होता . मयत शहाजी तीन ऑक्टोबर रोजी सकाळी गावातील दूध डेरीवर दूध वाढून गाय शेतात घेऊन गेला होता . दरम्यान त्याने गावातील भागवत कुलकर्णी यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेतल्याचे गावातील संतोष गांडुळे यांनी सांगितल्याचे मयताच्या वडीलांनी सांगीतले आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.