Latest Marathi News

BREAKING NEWS

शिंदे गटाची थेट राजस्थानात धडक थेट काँग्रेसच्या बड्या नेत्याने केला शिवसेनेत प्रवेश

0

राज्यात उद्धव ठाकरे गटाला खिंडार पाडल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला मोर्चा इतर राज्यात वळवला असून एकनाथ शिंदे यांनी आता थेट राजस्थानातच राजकीय भूकंप घडवून आणला आहे. राजस्थानातील काँग्रेसचा एक बड्या आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या खास विश्वासू नेत्याने थेट शिंदे गटात प्रवेश केला आहे.

राजस्थानमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठं खिंडार पडल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर महाराष्ट्रानंतर आता राजस्थानातही शिंदे गटाची ताकद वाढताना दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेस नेते राजेंद्र गुढा यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत राजस्थानच्या झुनझुनमध्ये गेले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या जाहीर आणि भव्य कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी गुढा यांना पक्षात प्रवेश दिला. त्यांच्या हातात शिवधनुष्य देऊन त्यांना शिवसेनेत घेतले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सभेला संबोधित केलं. शिंदे यांनी सुरुवातीला राजस्थानी भाषेतून भाषण करत यावेळी उपस्थितांची मने जिंकली.

राजेंद्र गुढा यांचं शिवसेनेत स्वागत आहे. त्यांनी एक चांगला निर्णय घेतला त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. राजस्थान ही वीरांची भूमी आहे. इथल्या जनतेला नमन करतो, अभिवादन करतो. आमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज आणि इथे महाराणा प्रताप यांचं नाव गाजलंय अशा भाषणाने सुरवात करून एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांची मने जाणून घेतली.

मुनगंटीवार महाराजांच्या वाघनखांनी भ्रष्टाचाराचा कोथळा काढता आला तर पहा…!

जरांगे पाटलांशी आम्हा घेणं-देणं नाही; काँग्रेस नेत्याचं मोठ विधान !

Leave A Reply

Your email address will not be published.