Latest Marathi News

BREAKING NEWS

जरांगे पाटलांशी आम्हा घेणं-देणं नाही; काँग्रेस नेत्याचं मोठ विधान !

0

नागपूर : मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र द्यावं, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मागील ११ दिवसापासून उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा १२ वा दिवस आहे. मराठा समाजाला कुणबी जातप्रमाणपत्र द्याव, त्या माध्यमातून आरक्षणाची मागणी पूर्ण करावी, अशी जरांगे पाटील यांची मागणी आहे. पण अजून यावर कुठलाही तोडगा निघालेला नाही.

शनिवारी मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाची शिंदे सरकारसोबत बैठक झाली. त्यानंतर सरकारच्यावतीने अर्जुन खोतकर एक बंद लिफाफा घेऊन येणार आहेत. हा लिफाफा जरांगे पाटील यांना देण्यात येईल. दरम्यान मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या मागणीमुळे ओबीसी समाजातील नेते आक्रमक होत चालले आहेत. माजी मंत्री आणि काँग्रेस नेते सुनील केदार यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठी समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केल्यामुळे सुनील केदार आक्रमक झाले आहेत. “मागच्या आठ-पंधरा दिवसापासून महाराष्ट्रात वेगवेगळे विषय सुरु आहेत. त्याला धरुन विशेषत: कुणबी समाजाबद्दल जो उल्लेख होतोय, कुणबी समाजाच्या ओबीसी आरक्षणाच्या विषयमामध्ये कुणी ढवळाढवळ केली, तर मान्य करणार नाही.

तसेच कुणबी समाजाच्या आरक्षणमध्ये कोणाचा किती जरी प्रयत्न असला, तरी हाणून पाडू. राज्य कोणाला लुटवायच असेल तर लुटवून टाका. पण कुणी आणच्या कुणबी समाजात्या अस्मितेला हात लावायचा प्रयत्न केला, तर फार मोठं भयंकर उत्तर देऊ” असा सुनील केदार म्हणाले. ‘आमची जमिनीवरची ताकद कुणी पाहिली नाही, ती दाखवून देऊ’ असे केदार यांनी म्हंटले आहे.

माजी महापौर किशोरी पेडणेकर विरोधात ईडीकडून गुन्हा दाखल

‘डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे मोदी पंतप्रधान झाले; आता सत्तेत येताच तेच संपवायला निघाले’

Leave A Reply

Your email address will not be published.