Latest Marathi News

BREAKING NEWS

मुनगंटीवार महाराजांच्या वाघनखांनी भ्रष्टाचाराचा कोथळा काढता आला तर पहा…!

0

मुंबई । छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे भारतात आणण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. येत्या नोव्हेंबर महिन्यात लंडन येथून त्या आणण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतची माहिती दिली आहे. याच मुद्द्यावरुन जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी ट्वीट करत थेट भाजपला टोला लगावला आहे. या ट्विटची आता चांगलीच जोरदार चर्चा रंगली आहे
.
माहिती अशी की, १ ऑक्टोबर रोजी राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार शिवरायांची वाघनखे भारतात आणण्यासाठी लंडनला जाणार आहेत. याबाबतची माहिती स्वतः सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. वाघनखे भारतात आणण्याच्या मुद्द्यावरुन जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी ट्वीट करत भाजपवर निशाणा साधला आहे.

नाना पाटेकर आपल्या ट्विटमध्ये म्हणतायत की, “मुनगंटीवार महाराजांची वाघनखे आणताय त्याबद्दल अभिनंदन, जमल तर त्या वाघनखांनी भ्रष्टाचाराचा कोथळा काढता आला तर पहा..” असा टोला नाना पाटेकर यांनी ट्वीटमधून लगावला आहे. सध्या नाना पाटेकरांचे हे ट्वीट चांगलेच चर्चेत आले आहे. या ट्विटवर भाजपा काय प्रतिक्रिया देते हे पाहावे लागणार आहे.

जरांगे पाटलांशी आम्हा घेणं-देणं नाही; काँग्रेस नेत्याचं मोठ विधान !

माजी महापौर किशोरी पेडणेकर विरोधात ईडीकडून गुन्हा दाखल

Leave A Reply

Your email address will not be published.