Latest Marathi News

BREAKING NEWS

शरद पवारांची पुन्हा भेट घेणार; अजित पवारांचे सूचक विधान

0

कोल्हापूर । अजित पवारांनी शरद पवार यांची साथ सोडून थेट शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री घेतली मात्र या सरकारला शब्द आवारांनी पाठिंबा न दर्शवत महाविकास आघाडीसोबत राहण्याचा निर्धार केला त्यामुळे राष्ट्र्वादीत सुद्धा सेनेप्रमाणे दोन गट तयार झाले होते अशातच पवारांची साथ सोडल्यानंतर अजित पवारांनी तीन वेळा भेट घेतली होती या भेटीमुळे एकच चर्चांना उधाण आले होते.

अशातच आता स्वतंत्र दिनानिमित्त अजित पवार झेंडावंदन कार्यक्रमासाठी कोल्हापुरात दाखल झाले होते यावर झेंडावंदन कार्यक्रमणानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. अशातच आता अजित पवार यांनी शरद पवार यांच्यासोबतच्या भेटीबाबत भूमिका मांडली आहे.

पुण्यातील एका व्यावसायिकाच्या घरामध्ये शरद पवार व अजित पवार यांची, शनिवारी (ता.१२ ऑगस्ट) भेट झाली. या भेटीनंतर बाहेर पडताना अजित पवार गाडीत झोपून गेले. ही दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्यानंतर पवार काका – पुतण्यांमधील या भेटीबाबत विविध चर्चा रंगल्या. पडद्यामागे नेमक्या काय हालचाली सुरु आहेत याबाबतचे विविध तर्कवितर्क लावण्यास सुरुवात झाली.

मात्र शरद पवार यांनी लागलीच याबाबत भूमिका मांडताना आपण भाजपसोबत जाणार नसल्याबाबत ठाम असल्याचा निर्वाळा केला होता. अशातच आज अजित पवार यांनीही याबाबत भूमिका मांडताना शरद पवार यांच्यासोबतच्या ती भेट गुप्त नव्हती असं सांगितलं आहे.

तर दुसरीकडे स्वातंत्र्यदिनानिमित्त कोल्हापूर येथे असलेल्या अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार यांच्यासोबतच्या भेटीबाबत विचारले असता, अजित पवार यांनी शरद पवार आपले काका असल्याने त्यांना भेटण्यात काहीही गैर नसल्याचे सांगितले. पुण्यात चोरडिया यांची घरी भेट झाली, चोरडिया यांच्याशी आमचे दोन दशकांचे कौटुंबिक संबंध असल्याचं तसेच ते शरद पवार यांचे वर्गमित्र असल्याचं अजित पवार म्हणाले.

अजित पवारांसमोरच मराठा आरक्षणाच्या बैठकीत मोठा गोंधळ; वाचा नेमकं काय आहे प्रकरण ?

नवरा मुंबईत तर गावी असलेली बायको दोन मुलं सोडून प्रियकरासह परदेशात पळाली

Leave A Reply

Your email address will not be published.