सीमा हैजर आणि अंजू हे नाव देशात चांगलंच चर्चेत असताना आता राजस्थानमध्ये राहणारी दीपिकाचं नाव चर्चेत आहे. दीपिका तिच्या मुलांना टाकून प्रियकरासोबत थेट परदेशात पळून गेली. या प्रकरणी तिच्या पतीनं पोलीस तक्रार दाखल केली आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे. मात्र दीपिकाचा शोध लागलेला नाही. दीपिका परदेशात पळून गेल्याचा अंदाज पोलिसांनी लगावला आहे.
सदर घटना डुंगरपूरच्या भैमई गावची आहे. गावात राहणारी दीपिका जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात प्रियकरासोबत निघून गेली. घरी काहीच न सांगता दीपिका परदेशात गेली. दीपिकाला दोन मुलं आहेत. पत्नी अचानक बेपत्ता झाल्यानं पतीनं चितरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र अद्यापपर्यंत तिचा ठावठिकाणा सापडलेला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या लोकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाला घेराव घालत घोषणाबाजी केली.
दीपिका दोन मुलांसोबत गावात राहायची, तर तिचा पती मुंबईत वास्तव्यास होता. पतीच्या अनुपस्थितीत ती वैद्यकीय उपचारांसाठी सातत्यानं गुजरात, उदयपूरला जायची. १० जुलैलादेखील ती हेच कारण देऊन गुजरातला गेली. पण १३ जुलैपर्यंत ती परतलीच नाही. या दरम्यान तिनं पतीला व्हॉट्स ऍप कॉल केला. ‘तू मला आनंदी ठेवत नाहीस. त्यामुळे दूर जात आहे,’ असं तिनं म्हटलं. त्यामुळे पतीच्या पायाखालची जमीन सरकली. त्यानं मुंबईहून गाव गाठलं. तेव्हा पत्नी घरात नव्हती. घरातील लाखोंचे दागिने आणि रोकड गायब होती. त्यानंतर पतीनं बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.
नवाब मलिक यांची अखेर सुटका; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा कुर्ल्यात जोरदार जल्लोष