Latest Marathi News

BREAKING NEWS

शरद पवार मोठे नेते त्यांनी गुपचूप भेटणं सोडावं; काँग्रेस नेत्याने लगावला टोला

0

मुंबई । राष्ट्रवादीचे नेते अजित पवार त्यांनी आपले काका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची साथ सोडून थेट शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील होत सरकारचा भाग झाले मात्र या सरकारला शरद पवारांनी पाठिंबा न दर्शवता महाविकास आघाडीसोबत राहण्याचा निर्धार केला त्यामुळे राष्ट्र्वादीत सुद्धा शिवसेनेप्रमाणे दोन गट तयार झाले होते अशातच पवारांची साथ सोडल्यानंतर अजित पवारांनी साहेबांची तीन वेळा भेट घेतली होती या भेटीमुळे एकच चर्चांना उधाण आले होते.

तर दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवार यांची भेट घेतली या सगळ्यावर महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेनेने आक्षेप नोंदवला. आता काँग्रेसचे माजी खासदार, काँग्रेसचे वरिष्ठ नेते हुसेन दलवाई यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस नेते हुसेन दलवाई हे सध्या माढा लोकसभा मतदारसंघात आहेत. तिथे ते आढावा घेत आहेत.

यावेल्ली माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. शरद पवार आणि अजित पवार यांच्या गुप्तभेटीवरही भाष्य केलं आहे. शरद पवार हे मोठे नेते आहेत. मात्र त्यांनी असे गुपचूप भेटणं सोडून द्यावं.यामुळे शंका निर्माण होत आहेत. जनतेच्या मनात संभ्रम होऊ लागला आहे.जे गेलेत त्यांना जाऊद्या ना. तुम्ही का भेटताय? असा सवाल हुसेन दलवाई यांनी विचारला आहे.

अजित पवारांसमोरच मराठा आरक्षणाच्या बैठकीत मोठा गोंधळ; वाचा नेमकं काय आहे प्रकरण ?

शरद पवारांची पुन्हा भेट घेणार; अजित पवारांचे सूचक विधान

Leave A Reply

Your email address will not be published.