एकीकडे महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्धा तापत असताना दुसरीकडे कोल्हापुरात राडा झाल्याचे वृत्त समोर येत आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीवर चर्चा करण्यासाठी उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत झालेल्या बैठकीत पुण्यातील कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. प्रथम बैठकीत प्रवेश नाकारल्यामुळे तर आत सोडल्यावर बंद खोलीत बैठक का घेतली असा जाब विचारत हा गोंधळ झाल्याने वृत्त समोर येत आहे.
आज अजित पवारांनी शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम झाल्यानंतर मराठा आरक्षण संबंधी बैठक झाली. यावेळी कोल्हापूर कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. सातारा, पुणे येथील कार्यकर्ते उशिरा आल्याने त्यांना पोलिसानी दारावर रोखले. आम्हाला ब्रिफींग करायचे आहे असे सांगत आत सोडण्याची विनंती केली. पण आत खोलीत बसायला जागा नसल्याचे कारण देत पोलिसांनी प्रवेश नकाराला.
यावेळी दरवाजावर बराच गोंधळ उडाला. पंधरा मिनिटांनी बैठक संपली. आतील कार्यकर्ते बाहेर येत असताना पुण्यातील कार्यकर्ते आत घुसले आणि अजित पवार यांच्या समोर गोंधळ घालण्यास सुरवात केली. यात पोलिसांनी हस्तक्षेप केला. पण योगेश केदार यांनी हातातील फाईल पवार यांच्यसमोर टेबलवर आपटल्या. बंद खोलीत बैठक का घेताय असा जाब विचारला.
नवरा मुंबईत तर गावी असलेली बायको दोन मुलं सोडून प्रियकरासह परदेशात पळाली
नवाब मलिक यांची अखेर सुटका; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा कुर्ल्यात जोरदार जल्लोष