मराठा आरक्षण प्रश्नी मराठा आंदोलक मनोज जरांगे आंदोलनावर ठाम असून आज पुन्हा एकादा शिंदे सरकारचा शिष्टमंडळ उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी पोहोचलं आहे. मंत्री संदीपान भुमरे आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर हे मनोज जरांगे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. अंतरवाली सराटी गावात जात मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी ते भेट घेत आहेत.
मात्र भुमरे आणि खोतकर यांच्यासह यावेळी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे देखील आले आहेत. काल सर्वपक्षीय बैठकीत झालेल्या निर्णयाबाबत मनोज जरांगे यांच्याशी या नेत्यांनी चर्चा केली आहे. या चर्चेनंतर मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेणार याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. मात्र संभाजी भिडे यांच्या उपस्थितीने घेतले असून विरोधकांना टीका करण्यासाठी मुद्धा मिळाला आहे.
मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज पंधरावा दिवस आहे. त्यांची प्रकृती रात्रीपासून खालावली आहे. अशातच समाजातील महिलांच्या विनंतीनुसार त्यांनी रात्री १२:२० च्या दरम्यान सलाईन लावून घेतली. त्यानंतर आता आज सरकारचं शिष्ठमंडळ जरांगे यांच्या भेटीला पोहोचलं आहे. यावेळी तब्येतीला सांभाळा. उपोषण मागे घ्या, अशी विनंती यावेळी करण्यात आली.
संदीपान भुमरे आणि अर्जुन खोतकर यांच्यासोबतच संभाजी भिडे यांनी मनोज जरांगे यांचं मन वळवण्याबाबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला. पण मनोज जरांगे अद्यापही आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. मी थोड्या वेळात माध्यमांशी बोलेन. तेव्हा माझी भूमिका स्पष्ट करतो, असं जरांगे म्हणाले. त्यामुळे जरांगे आता काय भूमिका घेतायत याकडे मराठा समाजाचे आणि संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.
अजित पवारांकडून थेट देवेंद्र फडणवीसांच्या खात्यात हस्तक्षेप ? वाद होण्याचे चिन्ह !
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच जर्मनी आणि लंडनच्या दौऱ्यावर !