Latest Marathi News

BREAKING NEWS

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच जर्मनी आणि लंडनच्या दौऱ्यावर !

0

मुंबई । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच काही महिन्यापूर्वी दावोसचा दौरा केला आणि आणि राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाल्याचे सांगितले. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या कंपन्यांसोबत चर्चा केली ते उद्योजक परदेशातील नव्हे तर हैदराबादचे आहेत, असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता.

आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जर्मनसह लंडन दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यामध्ये राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे देखील मुख्यमंत्र्यांसोबत असणार आहेत. तंत्रज्ञान आणि उद्योग संदर्भातली मुख्यमंत्री यांचीही महत्त्वाची लंडनवारी असणार असून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे आणण्याचा मानस असल्याच यावेळी त्यांनीसांगितले.

तत्पूर्वी मागच्या विदेश दौऱ्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. मंत्री आदित्य ठाकरे यांनी थेट दावोस दौऱयावरून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. मुख्यमंत्र्यांनी दाओसला जाताना घटनाबाह्य विमानाचा वापर केला होता. तसेच प्रत्येक दिवसाला साडेसात ते दहा कोटी असा खर्च दौऱ्यावेळी करण्यात आला हा जनतेचा पैसे जर सरकार अशा प्रकारे खर्च करत असेल तर कस चालेल मात्र हा खर्च दाखवण्यात आला नाही अशी टीका त्यांनी केली होती.

गावकऱ्यांचा आग्रह, अखेर जरांगे पाटलांनी लावून घेतली सलाईन !

अंतरवाली सराटीतील आंदोलकांवर लाठीचार्ज प्रकरणी पोलीस अधिकारी निलंबित; सर्व पक्षीय बैठकीत निर्णय

Leave A Reply

Your email address will not be published.