Latest Marathi News

BREAKING NEWS

अजित पवारांकडून थेट देवेंद्र फडणवीसांच्या खात्यात हस्तक्षेप ? वाद होण्याचे चिन्ह !

0

अजित पवार यांनी थेट शरद पवारांची साथ सोडून भाजपा बरोबर शिंदे फडवणीस सरकारमध्ये सामील झाले त्यानंतर ते थेट उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाले त्यामुळे राज्याला एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री लाभले त्यातच काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या खात्यात हस्तक्षेप केल्याने वाद झाला होता त्यानंतर आता अजितदादांनी देवेंद्र फडणवीसांच्या खात्यामध्ये ढवळाढवळ केली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (११ सप्टेंबर) देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या ऊर्जा खात्याची महत्वाची बैठक घेतली. त्यामुळे अजित पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या खात्यांमध्ये हस्तक्षेप करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या बैठकीनंतर भाजपा नेत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील खात्यातील हस्तक्षेप केल्यानंतर आता अजित पवार हे जाणून बुजून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या खात्यांमध्ये हस्तक्षेप करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अजित पवार यांनी सोमवारी मंत्रालयात ‘महावितरण’शी संबंधित प्रलंबित कामांचा तसेच नवीन कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला.

यामध्ये माढा, करमाळा, अकोले, अहमदनगर, खेड, कोपरगाव, मोर्शी, कळवण, निफाड, वसमत, औंढा, बारामती आदी तालुक्यांचा समावेश होता. या बैठकीला अजित पवार गटाचे आमदार नितीन पवार, डॉ. किरण लहामटे, देवेंद्र भुयार हे प्रत्यक्ष.तर, संजय शिंदे, दिलीप मोहिते- पाटील, दिलीप बनकर, चंद्रकांत नवघरे हे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. अशी बैठक घेऊन अजित पवार हे फक्त आपल्याच गटातील आमदारांचे प्रश्न सोडवत आहेत, अशी कुजबूज सुरू झाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच जर्मनी आणि लंडनच्या दौऱ्यावर !

गावकऱ्यांचा आग्रह, अखेर जरांगे पाटलांनी लावून घेतली सलाईन !

Leave A Reply

Your email address will not be published.