MMRDA च्या फलकावर छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; थेट मनसे वाहतूक सेनेने दिला आंदोलनाचा इशारा !
मुंबई | महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी नावाने उल्लेख होत असल्यामुळे छत्रपती शिवाजीमहाराज टर्मिनेट अर्थात CST असे नामकरण करण्यात आले मात्र याच एमएमआरडीए प्रशासनाला याचा विसर पडल्याचे चित्र दिसून येत आहे अशातच आता अधिकाऱ्यांना पुन्हा झोपेतून जाग करण्यासाठी थेट महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
सीएसटी (CST) हे नाव राज्य आणि केंद्र सरकारने बदलून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे नामकरण करून सहा वर्षे उलटली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होत असल्यामुळे केंद्र तसेच राज्य सरकारने मिळून हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मात्र अद्यापही स्वर्गीय माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख इस्टर्न फ्री वे वर CST असे जुनेच दिशादर्शक फलक झळकत आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे सरचिटणीस माऊली थोरवे यांनी या विरोधात थेट एमएमआरडीएला मसने वाहतूक सेनेच्या दिशादर्शक फलकावरील नाव बदलण्यासाठी सात दिवसाची मुदत दिल्ली आहे तसेच हे सर्व जुने फलक बदलून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे नवीन दिशा दर्शक फलक लावण्यात यावेत अशी मागणी केली आहे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मा राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने तीव्र आंदोलन करून हे सर्व जुने फलक उकडून टाकल्याशिवाय राहणार नाही असा निर्वाणीचा इशाराच मनसेने प्रशासनाला दिला आहे.