Latest Marathi News

BREAKING NEWS

रामदेव बाबांच्या औषधात नेमक आहे काय? ज्याने कोरोना रुग्ण बरा होणार

0

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाची रुग्णसंख्या ९२ लाखांवर पोहचलीय तर आजवर ४९ लाख ५६ हजार जणांची कोरोनाच्या आजारातून मुक्तता झाली आहे. तब्बल ४ लाख ७४ हजार जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. भारतामध्ये देखील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णसंख्येमध्ये आपला देश चौथ्या क्रमांकवर आला आहे.

दरम्यान, योगगुरू बाबा रामदेव यांनी कोरोनातून १०० टक्के बरे करणारे औषध आणले आहे. त्यांची संस्था पतंजलीने ‘कोरोनील’ हे कोरोना विषाणूला रोखणारे पहिलं आयुर्वेदिक औषधं आणल आहे. आचार्य बालकृष्ण यांनी स्वामी रामदेव यांच्या उपस्थितीत रिद्वारच्या पतंजली योगपीठात हे औषध लॉन्च केले .

नेमक काय आहे रामदेव यांच्या औषधामध्ये

कोरोनिलमध्ये गिलोय, अश्‍वगंधा, तुलसी, श्‍वसारी रस आणि अणू तेलाचे  मिश्रण आहे. हे औषध दिवसातून दोन वेळा घ्यावे लागणार आहे. सकाळी आणि संध्याकाळी या औषधाचे दररोज सेवन करावे लागणार आहे. या औषधामध्ये असलेला अश्वगंधा या व्हायरसच्या रिसेप्टर बाइंडिंग डोमेनला शरीरातील अँजिओटेन्सीन कनवर्टिंग एंजाइमला शरीरात प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करतं.

यावेळी संपूर्ण देश आणि जग कोरोनावरील औषध निघेल या आशेवर होतं. आम्ही कोरोनाचं पहिलं आयुर्वेदिक औषधं शोधलं आहे, पतंजली संशोधन संस्था आणि निम्स यांच्या संयुक्त विद्यमाने या औषधाचं संशोधन करण्यात आलं. ही औषधं वैद्यकीय तपासण्या आणि चाचण्यांमध्ये देखील सिद्ध झालं आहे. यासाठी मी या संशोधनातील सर्व वैज्ञानिकांचे आणि संशोधकांचे आभार मानतो, असं बाबा रामदेव यांनी म्हंटल आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.