Latest Marathi News

BREAKING NEWS

राज ठाकरे यांचा ड्रायवर निघाला कोरोना पॉझिटिव्ह

0

मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील तीन महत्वाचे नेते जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण आणि धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली होती आता हे तिघेही जण कोरोनावर मात करून आपल्या स्वगृही परतले आहेत. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे दोन ड्रायव्हर कोरोना पॉझीटिव्ह निघाले आहेत.

आता त्या दोघा वाहनचालकांवर सध्या मुंबईतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंच्या काही शासकीय सुरक्षा रक्षकांनाही कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्यांनी ‘कोरोना’वर यशस्वी मातही केली. सुरक्षा रक्षकांनी ‘कृष्णकुंज’च्या दारातच कोरोनाला रोखल्याचं बोललं जात होतं.

तर दुसरीकडे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून काल डिस्चार्ज देण्यात आला. दोन दिवसांपूर्वी त्यांची दुसरी कोरोना टेस्ट करण्यात आली. ही टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज मिळाला. मात्र नियमानुसार पुढील 14 दिवस धनंजय मुंडे यांना होम क्वारंटाईन राहावे लागणार आहे. धनंजय मुंडे यांना अकरा दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.

धनंजय मुंडे यांच्यासोबत कोरोनाची लागण झालेले त्यांचे खाजगी सचिव, एक स्वीय सहाय्यक, दोन वाहन चालक, एक अंगरक्षक यांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तर एक अंगरक्षक आणि एक कुक असे दोघे रुग्णालयात उपचार घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.