Latest Marathi News

BREAKING NEWS

राहुल गांधींविरोधात आता ललित मोदी ठोकणार ब्रिटनमध्ये केस

0

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी आडनावाच्या मुद्द्यावरून केलेल्या विधानावरून त्यांना जोरदार धक्के मिळताना दिसून येत आहे अधिक २ वर्षाची शिक्षा, त्यानंतर खासदारकी घेतली त्या पाठोपाठ सरकारी बंगला देखील खाली करण्यासाठी राहुल गांधी यांना नीटसा पाठवण्यात आली आता त्या पाठोपाठ ललित मोदीने दंड थोपटले आहेत. ललित मोदीने ट्विट करून राहुल गांधींविरोधात ब्रिटनच्या न्यायालयात खटला दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

IPL चे कधी-काळचे सर्वेसर्वा ललित मोदी याने राहुल गांधी यांना उघडपणे पप्पू म्हणत राहुल गांधी आता सामान्य नागरिक असल्याचे म्हटले आहे. मोदी याने भले मोठे ट्विट केले आहे. ”राहुल गांधी मला फरार म्हणत आहेत, परंतू त्यांच्याकडे याचे काय पुरावे आहेत. कोणत्या आधारे मला फरार म्हणत आहेत. मला कुठे दोषी ठरविले गेले आहे का? त्यांच्यासह विरोधी पक्षांचे नेते माहिती न ठेवता बदल्याचे राजकारण करत आहेत.”, असे ललित मोदीने म्हटले आहे.

पुढे बोलताना ते ट्विटमध्ये म्हणतायत की, मी या विरोधात राहुल गांधींवर युकेच्या कोर्टात खटला दाखल करणार आहे. मला खात्री आहे की ते माझ्याविरोधात सर्व ठोस पुरावे घेऊन येतील. राहुल गांधी स्वत:ला कसे मुर्ख बनवून घेतात हे मला पहायचे आहे. आर के धवन, सीताराम केसरी, मोतीलाल व्होरा, सतीश शर्मा, एनडी तिवारी रहे सर्व गांधी कुटुंबाशी संबंधीत आहेत. यांच्या परदेशात मालमत्या कशा आहेत? हे कमलनाथना विचारा, असा आरोपही ललित मोदीने केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.