Latest Marathi News

BREAKING NEWS

उद्योग आणि व्यापार गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात आघाडीवर – राज्यपाल रमेश बैस

0

मुंबई |

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. गेल्या काही वर्षात महाराष्ट्र सातत्याने उद्योग आणि व्यापार गुंतवणुकीत देशात आघाडीवर असल्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी सांगितले. सध्या भारताची ओळख विकसनशील देश म्हणून होत आहे.पण येणाऱ्या २५ वर्षात भारत विकसित देश म्हणून ओळखला जाईल असे केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले.

भारताच्या जी-२० अध्यक्षपदाच्या कारकीर्दीतील जी-२० व्यापार आणि गुंतवणूक कार्यगट सध्या मुंबईत आहे. आज या कार्यगटासाठी वांद्रे येथील हॉटेल ताज लॅण्डस् एन्ड येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती. राजशिष्टाचार विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यपाल यावेळी म्हणाले की, गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात वेगवेगळे पायाभूत सुविधा निर्माण करणारे प्रकल्प उभारण्यात येत आहे. महाराष्ट्रात व्यापार आणि गुंतवणुकीला पोषक असे वातावरण निर्माण करण्यात येत असल्याने गुंतवणूकदारांचे प्रथम पसंतीचे राज्य ठरेल असा विश्वास वाटतो

Leave A Reply

Your email address will not be published.