मुंबई |
उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. दरम्यान ‘राज्यभरात पोस्टर लावताना शरद पवारांचा फोटो लावा असे आदेश अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिल आहेत. मात्र राज्यात अनेक ठिकाणी अजित पवारांना शुभेच्छा देणाऱ्या जाहिरातीतून शरद पवारांना वगळल्याचं पाहायला मिळतंय. अजितदादांच्या पोस्टरवर पवारांचे फोटो लावण्याच्या आदेशावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.
सोलापुरात जाहिरातीत अजित पवारांसह नवनिर्वाचित मंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर दुसरीकडे अजित पवारांच्या पोस्टरवर पवारांचे फोटो लावण्याच्या आदेशावर कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. अजित पवारांना शरद पवारांचे फोटो वापरण्याचा अधिकार नाही, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना सोबत घेत सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला आहे. यापुढील सर्व निवडणुका घड्याळ या चिन्हावर लढणार असल्याचेही सांगितले. राज्याचे हित पाहून निर्णय घेतला आहे.अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत २०२४ ची निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लढवणार असल्याचे सांगितलेय. त्याशिवाय आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर भाजपसोबत का नाही ? असेही अजित पवार म्हणाले.