Latest Marathi News

BREAKING NEWS

गेल्या पाच वर्षात कृषी उत्पन्न बाजार समितीचा कायापालट…! –
ॲड.रणवीर राऊत

0

बार्शी |

बार्शी उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचा सत्ता पालट होऊन ५ वर्षे पूर्ण झाली.या ५ वर्षातील बाजार समितीचा झालेला कायापालट पाहिला तर नक्कीच या समितीच्या सभापती पदाची धुरा अत्यंत सुयोग्य हातात गेल्याची खात्री होते. बार्शी तालुक्याचे आमदार राजाभाऊ राऊत यांच्या मार्गर्शनाखाली बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत व संचालकांनी कित्येक वर्ष अधोगतीच्या चक्रव्यूहात अडकलेल्या बाजार समितीला कुशल नेतृत्वाच्या जोरावर बाहेर काढत शेतकऱ्याला अन् बार्शीकर जनतेला न्याय देऊन त्यांचा विश्वास सार्थ ठरवला आहे.

बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सत्ता बदलाला ५ वर्ष यशस्वी कार्यकाल पुर्ण झाल्याबद्दल सभापती ॲड.रणवीर राऊत, उपसभापती झुंबर(दादा)जाधव,संचालक रावसाहेब मनगिरे मालक,राजेंद्रकुमार गायकवाड,महादेव चोरघडे,काशिनाथ शेळके, सचिन जगझाप,वासुदेव गायकवाड,बुबासाहेब घोडके,चंद्रकांत मांजरे,श्रीमती शालन गोडसे, प्रभावती काळे,अरुण येळे,आण्णासाहेब कोंढारे,अनिल जाधव,कुणाल घोलप,साहेबराव देशमुख यांचा सत्कार बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने करण्यात आला.

गेल्या ५ वर्षांत खालील अनेक कामे आमदार राजाभाऊ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली व सभापती रणवीर राऊत यांच्या पुढाकाराने बाजार समितीच्या माध्यमातून करण्यात आली आहेत:- १) फळे व भाजीपाला विभागांमध्ये आडते व व्यापाऱ्यांसाठी गाळे व दहा हजार स्क्वेअर फुटाचे भव्य असे दोन सेल हॉल बांधलेले आहेत.२) बाजार समितीच्या आवारात १३० गाळ्यांचे शॉपिंग सेंटर,सब यार्ड वैराग येथे ६६ गाळ्यांचे शॉपिंग सेंटर,मुख्य बाजार समिती ऑफिस शेजारील २३ गाळ्यांचे व्यापारी संकुल उभारले आहे.३) बाजारातील शेतकऱ्यांची व जनावरांची गैरसोय लक्षात घेता बाजार समितीने शेतकऱ्यांच्या जनावरांचे ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण होण्याकरिता बाजार समितीने जनावरांनी करता आधुनिक पद्धतीचे ३० निवारा शेड उभारले आहेत.४) शेतकरी व व्यापारी यांच्या नाशवंत मालाची गैरसोय लक्षात घेता सदरची गरज दूर होण्याकरीता बाजार समितीने स्वतःच्या मालकीचे २००० मेट्रिक टन क्षमतेचे अद्यावत असे शितगृह बांधलेले आहे.५)शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा बाजारभाव येथे चढवताना होणारे नुकसान टाळण्यासाठी व त्यांच्या शेतमाल सुरक्षित रित्या साठवणूकी करता २००० मॅट्रिक टन क्षमतेचे व १००० मॅट्रिक टन क्षमतेचे असे दोन गोदाम उभारले आहेत.६) शेतमालाचे व कडब्याचे अचूक वजन होण्याकरिता ६० मेट्रिक टन क्षमतेचा व लातुर रोड बाजार आवार येथे ६० मेट्रिक टन क्षमतेचा असे दोन वजन काटे उभारले आहेत.७) शेतमाल लिलावासाठी मुख्य बाजारामध्ये भव्य सेल हाॅल उभारले आहे.८) मुख्य बाजार आवार व उपबाजार वैराग येथे शेतकरी हमाल आर्थिक व्यापारी व इतर घटकांच्या सोयी करतात ४६ स्वच्छतागृहे उभारली आहेत.९) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारामध्ये शेतकऱ्यांच्या सोयीकरिता शेतकरी निवासचे बांधकाम केलेले आहे तसेच लातूर रोड येथे नियोजित निवासाचे काम प्रगतीपथावर चालू आहे.१०) बाजार समितीच्या वतीने गांडूळ खत प्रकल्प उभारलेला आहे.११) शेतमाल तारण कर्ज योजना चालू केली १२) बाजार समितीची शासनाच्या इनाम योजनेचा प्रकल्पामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये निवड झालेली आहे.१३) धान्य चाळणी यंत्राचे काम प्रगतीपथावर आहे.१४) मुख्य बाजारामध्ये ९६ किलो वॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारलेला आहे.१५) शेतमालाच्या व इतर वस्तूंच्या होणाऱ्या चोऱ्या रोखण्याकरिता एकूण सत्तर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.१६) बाजार समितीच्या खुल्या जागेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले आहे.१७) मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरील खुल्या जागेतील सुशोभीकरण करण्यात आले आहे त्यामुळे बाजार समितीच्या निसर्ग सौंदर्यामध्ये वाढ झालेली आहे.

बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत यांनी बाजार समिती मार्फत बाजार समितीच्या फळे व भाजीपाला विभागात कोविड रुग्णांकरता १०० बेडचे सर्व सेवा सुविधांनी युक्त व्यवस्था असलेल्या कोवीड सेंटरची उभारणी केली होती, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व पंतप्रधान सहायता निधी याकरिता एक लाख निधी बाजार समितीच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे,कोरोना महामारीत सामाजिक बांधिलकी म्हणून कर्मवीर डॉ.जगदाळे मामा हॉस्पिटल बार्शी मधील डेडिकेटेड कोविड केअर हॉस्पिटल साठी कृषी उत्पन्न बाजार समितीने २५ लाख रुपये आर्थिक मदत केलेली आहे, कोरोना महामारीत आर्थिक संकटात सापडलेल्या गोरगरीब गरजू घटकांसाठी बाजार समितीने जीवनावश्यक अन्नधान्याची ४००० किट्सचे चे वाटप केलेले आहे.

सभापती रणवीर राऊत यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये मुख्य बाजार आवारात १२ कोटी ६ लाख ९५ हजार रुपयांची खालील कामे करण्यात आली आहेत:- रस्ते मजबुतीकरण व डांबरीकरण करणे,गटार बांधणे,तार कुंपण करणे,मुख्य ऑफिसचे रंगकाम,ऑफिस इमारतीच्या सभोवती व्यापारी गाळे बांधकाम, इमारतीच्या व प्रवेशद्वाराचे रंगकाम,सौर ऊर्जा प्रकल्प,कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शीचे हमाल भवन इमारतीस रंगकाम,शेतकरी निवास इमारत रंगकाम,गांडूळ खत प्रकल्प,स्वच्छतागृहे, शेतमाल साठविण्यासाठी शेड,वजन काट्याची दुरुस्ती व नूतनीकरण,सार्वजनिक मुतारी बांधकाम,पिण्याची पाईपलाईन,शेतकरी निवास शेजारी तोलार वारणी कामगार यांच्यासाठी निवारा शेड,सीसीटीव्ही कॅमेरे,गुमास्ता संघटने करिता निवारा शेड,हमाल भवन संरक्षण भिंत बांधकाम,खुली जागा सुशोभीकरण इ.

उपबाजार वैराग येथे २ कोटी ८९ लाख २८ हजार रूपयांची पुढील कामे करण्यात आली आहेत:- गेट क्र.१ व गेट क्र.२येथे रस्ता मजबुतीकरण करणे व डांबरीकरण,गेट क्र.१ व गेट क्र.२ रंगकाम,कार्यालयीन इमारतीचे रंग काम,पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन,सेल हॉल तयार,वाॅल कंपाऊंड,आरसीसी गटार,निवारा शेड बांधकाम,हमाल भवन बांधकाम,खुली जागा विकसित,तार कंपाऊंड इ.

लातुर रोड बाजार समिती आवारात ३ कोटी २५ लाख रूपयांची पुढील कामे करण्यात आली आहेत:-जनावरा मार्केट शेड बांधकाम,पिण्याची पाईपलाईन,तार कंपाऊंड इ.

मुख्य बाजार समिती आवारात ९ लाख ८८, लातुर रोड बाजार समिती आवारात ७ कोटी ३२ लाख रूपयांची विविध विकास कामे,उपबाजार वैराग येथे ४ कोटी ४५ लाख रूपयांची विविध विकास कामे चालू आहेत.

मुख्य बाजार समिती आवारात १ कोटी ८० लाख रूपये,लातुर रोड बाजार समिती आवारात २ कोटी ९५ लाख रूपये, उपबाजार वैराग येथे १ कोटी ५४ लाख रुपयांची विकासकामे करण्यात येणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.