पुणे । राज्यात लोकसभा निवडणुकी पाठोपाठ विधानसभा निवडणुकीत पार पडणार पडणार आहे अशातच शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात पडलेल्या फुटीमुळे यंदाची लोकसभा आणि विधानसभा अधिक रंगतदार असणार हे आता सांगायची गरज नाहीये, अशातच भारतीय जनता पक्षाकडून आमदारांच्या कामगिरीचा आढावा घेतला जात आहे. त्याचवेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुणे शहरातील विधानसभा मतदार संघाची तयारी केली जात आहे. त्यासाठी उमेदवारची चाचपणी केली जात आहे. हडपसर विधानसभा मतदार संघातील उमेदवार राष्ट्रवादीकडून ठरल्याची माहिती समोर येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार चांगले आक्रमक झाले आहेत. राज्यात सर्वत्र शरद पवार यांचा सभा होत आहेत. त्यानंतर आता अजित पवार यांनीही उत्तर सभा घेणे सुरु केले आहे. रविवारी अजित पवार यांनी कोल्हापुरात उत्तर सभा घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचा गड असणाऱ्या पुणे शहरात विधानसभेची तयारी शरद पवार करत आहे. त्यासाठी संभाव्य उमेदवारांची आतापासूनच चाचपणी सुरू आहे.
शरद पवार गटाने आतापासूनच विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हडपसर मतदारसंघातील उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रशांत जगताप यांना विधानसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश वरिष्ठ स्तरावरून दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. महाविकास आघाडीचे जागा वाटप ठरले नसतानाही प्रशांत जगताप यांना तयारी करण्याचे आदेश शरद पवार यांच्याकडून दिल्याचे वृत्त आहे. यामुळे हडपसरची जागा शरद पवार गटाकडेच जाण्याची शक्यता आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी केलेल्या कामाची वर्तमान पत्रात जाहिरात !
अजितदादा इमानदारीची भाषा करू नका; तुम्ही का ? गेलात आम्हाला माहिती आहे !