Latest Marathi News

BREAKING NEWS

देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी केलेल्या कामाची वर्तमान पत्रात जाहिरात !

0

मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मागच्या दोन आठवड्यापासून उपोषण सुरू केले होते. हे उपोषण थांबवण्याची मागणी करत पोलिसांनी आंदोलकांवर आणि उपोषणकर्त्यांवर लाठीहल्ला केल्यामुळे मराठा आंदोलकांनी गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यावर रोष व्यक्त केला होता. या घटनेनंतर ठिकठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मराठा समाजाने राग व्यक्त केला होता.

तर दुसरीकडे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून केलेल्या लाठीचार्ज हल्ल्यानंतर मराठा आंदोलकांनी फडणवीसांच्या फोटोची अंत्ययात्रा काढून, फोटो जाळून त्यांचा निषेध केला होता. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील राजेंद्र साबळे पाटील यांच्या नावाने जाहिरात देण्यात आली असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी केलेल्या कामाची माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आला आहे.

काय आहे जाहिरातीमध्ये ?

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ वैयक्तिक कर्ज व्याज परताा योजना, राजर्षी शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना, सारथी राष्ट्रीय अधिछात्रवृत्ती योजना, महाराणी ताराराणी स्पर्धा परिक्षा, कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम, सारथी विभागीय कार्यालये, श्रीमंत मालोजीराजे भोसले सारथी व इंडोजर्मन टूल रूम प्रशिक्षण, छत्रपती राजाराम महाराज सारखी शिष्यवृत्ती योजना, महाराजा सयाजीराव गायकवाड परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजना, छत्रपती शिवाजी महाराज स्मृतीग्रंथाच्या ५० हजार प्रती प्रकाशित या कामाचा उल्लेख या जाहिरातीमध्ये करण्यात आला आहे.

अजितदादा इमानदारीची भाषा करू नका; तुम्ही का ? गेलात आम्हाला माहिती आहे !

कोल्हापूर सभा । अजित पवारांच भाषण सुरु होताच नारिकांनी फिरवली पाठ

Leave A Reply

Your email address will not be published.