Latest Marathi News

BREAKING NEWS

धनंजय मुंडेंना इतिहास माहिती नाहीये बनवाबनवी करून मिठी मारणाऱ्यांचा महाराष्ट्रात…..

0

मुंबई । शरद पवार यांची कोल्हापुरातील दसरा चौकात सभा पार पडल्यानंतर काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोल्हापुरातील तपोवन मैदानात जाहीर सभा पार पडली या सभेत अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्या सभेत जितेंद्र आव्हाड यांनी कोल्हापूरी चपलेचा उल्लेख करत थेट हसन मुश्रिफांवर केलेल्या टीकेचा समाचार घेतला आता मुंडेंच्या या टीकेला आज जितेंद्र आव्हाड यांनी सडेतोड प्रतिउत्तर दिले आहे. या संदर्भात त्यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझल खान यांच्या भेटीचा संदर्भ देत धनंजय मुंडे यांच्यासह हसन मुश्रीफ यांना टोला लगावला होता.

ते ट्विटमध्ये म्हणतायत की, कालच्या सभेत धनंजय मुंडे यांनी हसन मुश्रीफ यांचे नाव घेत त्यांनी जर जितेंद्र आव्हाड यांना मिठी मारली तर जितेंद्र आव्हाडांच्या बरगड्या तुटतील असं भाष्य केलं. कदाचित त्यांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही की, बनवा बनवी करून मिठी मारणा-याचा महाराष्ट्रामध्ये कोथळा बाहेर काढला जातो. हे कायम लक्षात ठेवा.असे त्यांनी म्हंटले आहे.

अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडून भाजपा बरोबर सत्तेत सामील झाल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी अजित पवार गटात प्रवेश केला यावरून जितेंद्र आव्हाड यांनी ईडीच्या नोटीसाच्या धाकामुळे मुश्रीफ यांनी शरद पवारांची साथ सोडल्याचे विधान जितेंद्र आव्हाड यांनी दसरा चौकात झालेल्या सभेत केले होते तसेच या दोन्ही नेत्याच्या टिकेमध्ये कोल्हापूरच्या प्रसिद्ध कोल्हापुरी चपलेचा मात्र उल्लेख झाल्याचे पाहायला मिळाले होते.

पुणे विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा ‘हा’ उमेदवार ठरला; शरद पवारांचे तयारीला लागण्याचे आदेश ?

देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी केलेल्या कामाची वर्तमान पत्रात जाहिरात !

Leave A Reply

Your email address will not be published.