Latest Marathi News

BREAKING NEWS

अजितदादा इमानदारीची भाषा करू नका; तुम्ही का ? गेलात आम्हाला माहिती आहे !

0

मुंबई । कोल्हापूर येथे पार पडलेल्या उत्तरसभेमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत बसण्याचे कारण सांगितले. आम्ही कुणाच्या दबावाखाली भाजपसोबत गेलो नाही. तर आम्हाला विकासाची कामे करायची होती. कामांचा दबाव होता, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तर दुसरोकडे काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अजितदादांचा हा दावा फेटाळून लावला आहे. या मुद्द्यावर त्यांनी थेट अजित पवार यांना खुलं आव्हानच दिलं आहे. तसेच योग्यवेळ येताच पोलखोल करण्याचा इशाराही दिला आहे.

माध्यमांशी संवाद साधताना वडेट्टीवार म्हणाले की, अजितदादांना किती इमानदारीची भाषा करू दे. आमच्याकडे पण पुरावे आहेत. कोण कशासाठी गेला हे आम्हाला माहीत आहे. सत्तेसाठी गेला. सेवेसाठ कोण गेलं? विकासासाठी कोण गेलं? ईडीच्या दबावात कोण गेलं? हे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत. योग्य वेळी आवश्यकता असल्यास कोर्टाच्या आदेशापासून सगळं उघड करू. विरोधकांना ज्या धमक्या देतात ते आम्ही सहन करणार नाही. महाराष्ट्रा जनतेला माहीत आहे तुम्ही कितीही तुमचे पाप लपवले तरी लपणार नाही, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार सुनील तटकरे यांच्यावरही जोरदार निशाणा साधला होता. सुनील तटकरे कुणाचा मुख्यमंत्री बनवण्याचे पोस्टर बॅनर लावण्याचं काम करत आहेत. फटा पोस्टर निकला हिरो. आता कुठे पोस्टरमधून कोण निघतील. मुख्यमंत्री होण्याचे स्पर्धा लागलेली आहे. तसेच बाशिंग बांधून फिरू नका, असा सल्ला विजय वडेट्टीवार यांनी तटकरे यांना दिला.

कोल्हापूर सभा । अजित पवारांच भाषण सुरु होताच नारिकांनी फिरवली पाठ

चकाचक मुंबई : आता रेल्वे स्थानकावर घाण करणाऱ्यांची खैर नाही

Leave A Reply

Your email address will not be published.