Latest Marathi News

BREAKING NEWS

पुणे शहर वाहतूककोंडी मुक्त शहर करण्याचा आमचा प्रयत्न असणार; देवेंद्र फडणवीसांची ग्वाही

0

पुणे शहरातील चांदणी चौकाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम शनिवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे शहराचा विकासाचा आराखडा मांडला. तसेच पुणे मेट्रोच्या आधी नागपूर मेट्रो का झाली? कोणत्या कारणामुळे पुणे मेट्रोचा प्रकल्प रखडला, हे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पुणे विमानतळाचे काम दहा वर्षांआधी झाले असता तर पुण्याचा विकास दर अधिक असता, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, पुणे हे बुद्धिवंतांचे शहर म्हणून ओळखले जाते. यामुळे पुण्यात निर्णय घेताना दमछाक होते. मेट्रोसंदर्भात असेच झाले. पुणेकर एका प्रस्ताववर समाधानी होत नाही. एक प्रस्ताव आणला तर दुसऱ्या देशातील आणखी प्रस्ताव येतो. मग आणखी नवी प्रस्ताव येतो. यामुळे पुणे मेट्रोचा प्रस्ताव रखडला गेला. परंतु पुण्याच्या नंतर नागपूर मेट्रोसंदर्भात प्रस्ताव आला. त्यानंतर नागपूर मेट्रो पूर्ण झाली. परंतु पुणे मेट्रो रखडली गेली.

“भाजप हे ब्रिटिशापेक्षा भयंकर व जुलमी., 2024ला यांचा सूर्य मावळेल”
मोदींनी त्यांच्या भाषणातून काँग्रेसला मोठं केलं; सामनातून ठाकरे गटाने साधला निशाणा

पुणे शहरात विमानतळही 10 वर्षे आधी झाला असता तर पुण्याच्या GDP मध्ये 2 टक्क्यांनी भर पडली असती. पुणे शहरातील वाहतूक कोंडी हा गंभीर विषय आहे. यामुळे या ठिकाणी रिंग रोड आणि सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधा निर्माण करण्याची गरज होती. आता पुण्यातील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी डबल डेकर पूल तयार करण्याचा प्लॅन नितीन गडकरी यांनी तयार केला आहे. यामुळे पुणे शहर वाहतूककोंडी मुक्त शहर करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.