Latest Marathi News

BREAKING NEWS

“भाजप हे ब्रिटिशापेक्षा भयंकर व जुलमी., 2024ला यांचा सूर्य मावळेल”

0

मुंबई । ठाकरे गटाचे नेते आणि खादर संजय राऊत दररोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटासह संपूणर भारतीय जनता पक्षावर निशाणा साधतात अशातच दररोजप्रमाणे आजसुद्धा संजय राऊत यांनी पत्रकार परिषेद आयोजित केली होती. यावेळी माध्यमांशी संवाद साधत केंद्रावर व भारतीय जनता पक्षावर घणाघाती टीका केली.

सध्या भाजपात अहंकार दिसत आहे, त्यांचा अहंकार 2024 च्या निवडणुकीत दिसणार नाही. 2024 साली त्यांचा सूर्य मावळेल, असे राऊत म्हणाले. तसेच सध्या भाजपाकडे वॉशिंग मशीन आहे. दुसऱ्या पक्षात घोटाळा भ्रष्टाचार करून भाजपाकडे गेले की तुम्ही भ्रष्टाचारमुक्त होता. भाजपाकडे मोठ्या प्रमाणात वॉशिंग मशीन आहे, सध्या आयाराम यांचं भरती आहे, अशी टीका संजय राऊत यांनी भाजपावर केली.

दरम्यान, स्वतंत्रपूर्व काळात ब्रिटिश होते त्यांनी स्वातंत्र्य सैनिकावर व भारतीय यावर मोठे जुलूम केले त्रास दिला. पण त्या ब्रिटिशापेक्षाही आत्ताचे भाजपावाले भयंकर आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून विरोधकांना नामोहरम करत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, काल नवाब मालिकाना दीड वर्षानंतर जामीन मिळाला आहे. जामीन देताना कोर्टाने प्रकृतीची कारण देत जामीन मंजूर केला. पण आता मलिकाना कुठले तरी वेगळे राजकीय इंजेक्शन मिळाले आहे, त्यामुळे त्यांना जामीन मिळाला अन्यथा जामीन मिळाला नसता, अशी बोचरी टीका सुद्धा संजय राऊत यांनी केली.

मोदींनी त्यांच्या भाषणातून काँग्रेसला मोठं केलं; सामनातून ठाकरे गटाने साधला निशाणा

“ढाई किलो का हाथ म्हणजे चाळीस कोटींची ओपनिंग. सनी पाजी….. सलमान खान याने दिल्या शुभेच्छा !

Leave A Reply

Your email address will not be published.