मुंबई । पुणे येथिक चांदणी चौक पुलाच्या उदघाटन संभारंभ कार्यक्रमाला हजर न राहताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या साताऱ्यातील दरे या गावी गेले आहेत. मुख्यमंत्री नेहमी आपल्या गावी जात असल्याने शेतीसाठी ते गावाला गेले असावेत असं सांगितलं जात होतं. पुण्यात चांदणी चौकाच्या उड्डाण पुलाच्या कार्यक्रमालाही मुख्यमंत्री उपस्थित झाले नाहीत.
या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऑनलाईन सहभागी होणार असल्याचं नंतर सांगण्यात आलं. पण ते ऑनलाईनही आले नाहीत. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं. तेवढ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती ठिक नसल्याने ते आजच्या कार्यक्रमाला येऊ शकले नसल्याचं सांगण्यात आलं. मात्र, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी एकनाथ शिंदे यांची प्रकृती प्रचंड खराब असून त्यांना जबरदस्तीने अॅडमिट करणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीवरून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
आमदार संजय शिरसाट यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 24 तास काम करतात हे महाराष्ट्र जाणतो. आम्ही सर्व आमदारांनी त्यांना डॉक्टरकडे जाण्याची विनंती केली आहे. 15 ऑगस्ट नंतर त्यांना… बळजबरीने हा शब्द मुद्दाम लक्षात ठेवा. त्यांना बळजबरीने हॉस्पिटलमध्ये पाठवणार आहोत. त्यांची तब्येत एवढी खराब आहे, त्याची कल्पना तुम्हाला नसेल. आम्ही जवळ राहतो. आम्हाला माहितीये, असं संजय शिरसाट म्हणाले.
पुणे शहर वाहतूककोंडी मुक्त शहर करण्याचा आमचा प्रयत्न असणार; देवेंद्र फडणवीसांची ग्वाही
“भाजप हे ब्रिटिशापेक्षा भयंकर व जुलमी., 2024ला यांचा सूर्य मावळेल”