नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीवरून देशात चांगलंच वाद निर्माण झाला होता. विरोधकांनी याच मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाला चांगलेच घेरले होते. अशातच आता उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी डिग्रीवरून भाजपाला टोला लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पॉलिटिकल सायन्समधील पदवी ऐतिहासिक आणि क्रांतिकारी आहे, यावर माझा प्रामाणिक विश्वास आहे. त्यामुळे आता ती पदवी आमच्या नवीन संसद भवनाच्या भव्य प्रवेशद्वारावर प्रदर्शित केली जावी, जेणे करून लोक शंका उपस्थित करणार नाहीत’ असे खासदार संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीवरून गेल्या काही दिवासांपासून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिक्षण किती झाली आहे, पदवी दाखवा अशी मागणी केली होती. मात्र, या प्रकरणात सुनावणी करताना काही दिवसांपूर्वी गुजरात उच्च न्यायालयाने केजरीवाल यांना फटकारले असून, त्यांना 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयावर केजरीवाल यांनी नाराजी व्यक्त केली आहे
राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरवरून जोरदार टोला लगावला आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘काही लोक माननीय पंतप्रधानांची पदवी खोटी असल्याचं म्हणत आहेत. पण पंतप्रधानांची पॉलिटिकल सायन्समधील पदवी ऐतिहासिक आणि क्रांतिकारी आहे, यावर माझा प्रामाणिक विश्वास आहे. त्यामुळे आता ती पदवी आमच्या नवीन संसद भवनाच्या भव्य प्रवेशद्वारावर प्रदर्शित केली जावी, जेणे करून लोक शंका उपस्थित करणार नाहीत.’